गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील गाड्याचे प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळे सर्व सामान्य वक्तीपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा सेलिब्रेटी संतापलेले पाहायला मिळतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर चिंता व्यक्त केली आहे.
नम्रताने (Namrata Sambherao ) पोस्ट करताना लिहिले की, “काय करायचं घोडबंदर रोड चं , loaded ट्रक टेम्पो पलटी होतायत साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते किमान 95% प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडलाय त्याचा हि थांगपत्ता लागत नाही कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय .. सुखसोयी असलेले मोठमोठाले tower झालेत खरं पण सुखाचा प्रवास कसा होईल ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रो चं काम चालू आहे पण ती सुद्धा गायमुख पर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिक ला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला 2 ते 3 तास लागतात. काय होऊ शकतं ह्यावर.”
तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “दर 5 वर्षांनी सतत सरकारं बदलत राहणे हाच उपाय…! त्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत…” तर दुसऱ्याने लिहिले की, “कलाकार प्रशासनावर व्यक्त होऊ लागलेत… चांगली गोष्ट आहे समाजासाठी” असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.
या पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी संभेराव यांच्याशी सहमती व्यक्त केली आहे. काही लोकांनी सरकारला वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. मुंबई हे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या आहे. वाहतूक कोंडीमुळे लोकांना कामावर आणि घरी पोहोचण्यासाठी कित्येक वेळ लागतो. यामुळे प्रदूषणही वाढत आहे. (‘Hasyajatra fame actress Namrata Sambherao Facebook post went viral after she suffered due to traffic jam)
आधिक वाचा-
–‘या’ प्रसिद्ध गायिकेच्या वडिलांना आणि भावाला अटक; अनैतिक संबंधातून केली चुलत भावाची ह’त्या
–शिमरी ब्लॅकलेस गाऊनमधील डेझी शाहचा बोल्ड अंदाज