अभिनेत्री हीना खानला स्तनांचा कर्करोग झाल्याचं निदान काही महिन्यांपूर्वी झालं होतं. काही चाचण्या करताना करताना तिला हे समजलं होतं. हि बातमी तिने सोशल मिडीयावर पोस्ट करून सांगितली होती. हीना ने कठीण काळात स्वतःला चांगल्या प्रकारे सावरलं आहे. ती नियमित उपचार घेते आहे. सर्जरी आणि किमोथेरीपी झाल्यानंतर तिने आता तिच्या शूटिंग सुद्धा रिझ्युम केल्या आहेत. त्याचप्रमाणे ती आता जिम मध्येही जाताना बघितली जात आहे.
हीना ने आज इन्स्टाग्रामवर एक व्हीडीओ पोस्ट केला आहे ज्यात भर पावसात ती जीमला जाताना दिसत आहे. त्यात तिने या पोस्ट सोबत लिहिलंय की, तुमच्याकडे कोणता बहाना आहे ? तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे. पण जर एखादी व्यक्ती एखाद्या आजाराचा सामना करत असेल, तर मग तर व्यायामाचं महत्त्व अजूनच वाढून जातं.
हीना पुढे लिहिते की, नियमित व्यायाम केल्याने तुम्ही फक्त शरीरीक बाबतीतच नाही तर मानसिकरित्या देखील निरोगी राहता. मानसिकरित्या निरोगी राहणे अतिशय गरजेचे आहे. माझ्या किमो उपचारांदरम्यान मला गंभीर न्यूरोपॅथिक वेदना होतात, माझे पाय आणि बोटे बहुतेक वेळा सुन्न होतात, कधीकधी व्यायाम करताना माझ्या पायांवरचे नियंत्रण सुटते. पाय सुन्न झाल्यामुळे मी खाली पडते, पण मी फक्त परत उठण्यावर लक्ष केंद्रित करतेमी स्वतःला खाली पडू देणार नाही. मी प्रत्येक वेळी उठेन आणि उठण्यासाठी दाखवलेल्या सामर्थ्यानेच पुढे मी ओळखली जाईन.
हिनाच्या या पोस्टवर यूजर्स तिच्या हिम्मतीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘एवढ्या नाजूक काळात तू ज्या धैर्याने वागलीस त्यामुळे तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे’. दुसरा युजर लिहितो की, ‘तू एक सशक्त मुलगी आहेस, आम्हाला तुझा अभिमान आहे’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘देव तूला लवकर बरे करो.’ हिनाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने छोट्या पडद्यावर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून लोकप्रियता मिळवली. यात ती अक्षराच्या भूमिकेत दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
किरण रावचा ‘लापता लेडीज’ दाखवला जाणार सर्वोच्च न्यायालयात! स्क्रीनिंग साठी कोर्टात पोचला आमीर खान