ऋतिक रोशनच्या चाहत्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम, ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकची रिलीझ डेट आली समोर


आपल्या अभिनयाने, डान्सने आणि स्टंटने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन होय. त्याच्या ‘वॉर’ चित्रपटाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली होती. यशराज फिल्म्स यांच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटीपेक्षाही जास्त कमाई केली होती. या चित्रपटातील त्याच्या स्टाईल आणि अंदाजाने सर्वांचे मन जिंकून घेतले होते. आता त्याचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट बघत आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, या वर्षी 10 जानेवारीला ऋतिकच्या वाढदिवशी त्याने घोषणा केली होती की, तो त्याच्या ‘फायटर’ या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. (Hritik Roshan’s Vikram vedha movies remake release date declared)

या चित्रपटासोबत त्याचे चाहते त्याला लोकप्रिय तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’ च्या हिंदी रिमेकमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत. या आगामी चित्रपटात तो सैफ अली खानसोबत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट 30 सप्टेंबर, 2022 रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

बॉक्स ऑफिसचा विचार करता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एकदम बरोबर आहे. हा चित्रपट त्याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. जेव्हा संपूर्ण देशात गांधी जयंती आणि दसरा साजरा होत असणार आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची ही एक संधी असणार आहे. या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक गायत्री आणि पुष्कर हेच हा रिमेक देखील बनवणार आहे. ‘फायटर’ हा चित्रपट 30 सप्टेंबर, 2022 रोजी प्रदर्शित होणार होता पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.

ऋतिक रोशन हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता त्याचा हा चित्रपट काय जादू करणार आहे. याची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.