आश्चर्यकारक! अभिनेत्री श्वेता तिवारीविरोधात पतीची कोर्टात धाव; केला मोठा आरोप


अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यात वैवाहिक तणाव निर्माण झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. श्वेताने अभिनव विरोधात आपल्या मुलीवर अपशब्द वापरल्याचा आणि घरगुती हिंसाचार केला असल्याची तक्रार काही महिन्यांपूर्वी केली होती. याशिवाय दोघांच्या नात्याबद्दलही अनेक माध्यमातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता. श्वेता आणि अभिनव यांचे लग्न तुटल्याने ते दोघेही सध्या विभक्त राहतात. या दोघांच्या मुलाचा सांभाळ करण्यावरून पती- पत्नीमध्ये सध्या वाद सुरू आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार अभिनवने श्वेतावर आपल्या मुलाला भेटू न देण्याचा आरोप केला आहे. अभिनवने आपला मुलगा रेयांश याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात डिसेंबर २०२० मध्ये धाव घेतली. त्यामध्ये अभिनवने श्वेतावर आपला मुलगा रेयांश याला भेटू न देण्याचा आरोप केला आहे. याबाबत अभिनवची वकील तृप्ती शेट्टी यांनी आपल्या एका मुलाखतीत संगीतले आहे की, “डिसेंबरमध्ये अभिनवने श्वेताविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अभिनवला आपल्या मुलाला भेटायची परवानगी दिली जात नव्हती. डिसेंबर महिन्यात जेव्हा श्वेता कोरोना पॉझिटिव्ह आली होती, तेव्हा त्याने रेयांशची संपूर्ण काळजी घेतली होती. परंतु आता ठीक झाल्यावर ती पुन्हा त्याला घेऊन गेली. अभिनवने बऱ्याच वेळा रेयांशबद्दल विचारण्यासाठी संपर्क देखील केला होता. पण त्याला आपल्या मुलाबद्दल काहीच अंदाज नाही की तो कुठे असेल. त्यासाठी त्याने पोलिसांची देखील मदत घेतली होती परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.”

पुढे त्या म्हणतात की, “डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यावेळी दिलेल्या तारखेच्या दिवशी श्वेता हजर होती. आपल्या वकिलाची नेमणूक करण्यासाठी तिने थोडा वेळ मागितला होता, दरम्यान आम्ही श्वेताला रेयांशला अभिनवला भेटायची विनंती केली. मग ते व्हिडिओ कॉन्फरन्सवर का असेना. त्यावेळी कोर्टाने त्यावर मंजुरी दिली आणि कोर्टाच्या आदेशानुसार दररोज अभिनव रेयांश सोबत संध्याकाळी ६ ते ६.३० या वेळेत बोलू लागला.”

अभिनव आणि श्वेता यांच्यात काही कारणास्तव भांडणे चालू आहेत. या दरम्यान रेयांशला आपल्या पित्याला भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचप्रमाणे तो आपल्या मुलाची जबाबदारी देखील सांभाळायला तयार असून लवकरच याबाबत न्यायालयात दोन्ही बाजूंनी विचार केला जाईल, असे तृप्ती शेट्टी यांनी म्हटले आहे.

अभिनव १२ नोव्हेंबर २०२०पासून आपल्या मुलाला भेटला नाही आहे. २७ तारखेला त्याचा वाढदिवस असूनही त्याला मुलाला भेटता आले नाही आणि याच कारणामुळे त्याला न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली. जेणेकरून त्याला योग्य तो न्याय मिळेल, असे अभिनव म्हणाला.

सन २००७ मध्ये राजा चौधरी याच्यासोबत घटस्फोट घेतले होते. त्यानंतर सन २०१० मध्ये ती अभिनवला डेट करत होती. सन २०१३ च्या ‘झलक दिखला जा’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये तिने अभिनवसोबत लग्न करत असल्याचे जाहीर केले होते. १३ जुलै २०१३ ला त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले. या लग्नात श्वेताचे जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाजीगरमधल्या ‘छुपाना भी नहीं आता’ गाण्यातील अभिनेत्याने अगदी कमी वयातच सोडले जग, वाचा त्याची कहानी

-पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ सुखी संसार करुन घटस्फोट घेणारे बॉलीवूड तारे, एकाचा संसार तर २२ वर्षांनी मोडला

-चित्रपटसृष्टीला बहारदार संगीत देणारे ‘मोहम्मद खय्याम’, त्यांच्या जबरदस्त संगीताने केली प्रेक्षकांवर जादू


Leave A Reply

Your email address will not be published.