समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत इलियाना डिक्रुझचे (Ileana D’cruz) नाव हमखास येते. चित्रपटातून तिच्या अभिनयाने ती प्रेक्षकांचे मनोरंजन तर नेहमीच करत असते. यासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय राहून ती तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत माहिती देत असते. अशातच तिचे काही बोल्ड फोटो समोर आले आहे.

इलियाना नुकतेच काही दिवसांपूर्वी मालदीव ट्रीपवरून परत आली आहे. तेथील अनेक फोटो याआधी देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच तिने पुन्हा एकदा मालदीवमधील थ्रो बॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच स्विमिंग पूलमध्ये देखील चील मारताना दिसत आहे. एका फोटोमध्ये ती समद्राच्या कडेला झोपलेली दिसत आहे, तर बाकी फोटोमध्ये ती समुद्रात आहे. (Ileana D’Cruz share her Maldives throw back photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कोवळे उन घेणे आणि नंतर शांत शांत निळ्या समुद्रात स्वत:ला बुडवून घेण्यापेक्षा कोणतीही चांगली भावना नाही.” तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोला मिळणारे लाईक्स तिने हाईड केले आहेत. त्यामुळे या फोटोला नक्की लाईक्स मिळाले आहेत, हे समजले नाही. परंतु कमेंट्समार्फत मात्र अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

इलियानाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक कामे केली आहेत. त्यानंतर तिने तिच्या अभिनयाचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. तिने २०१२ साली ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने ‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘मैं तेरा हिरो’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तसेच आगामी काळात तिला नवीन चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

आलिया भट्टने केलं सैफ अली खानच्या मुलाला रिजेक्ट, कारण ऐकून तर करीना कपूरलाही वाटेल वाईट!

खरंच की काय! ब्रा न घालताच इव्हेंटमध्ये पोहचली ईशा गुप्ता, केवळ ब्लेझरने झाकलं अंग

सलमानच्या चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाली होती बहीण अलवीराची ‘लव्हस्टोरी’, तर ‘अशी’ होती कारकीर्द 

 

 

Latest Post