Sunday, July 14, 2024

‘केजीएफ’ ते ‘दसवी’पर्यंत, ही आहे IMDBची टॉप 10ची यादी, एप्रिलमध्येही होणार साउथचाच जलवा

सध्या देशभरात ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘केजीएफ’च्या जोरदार यशाने हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्यातरी बॉक्स ऑफिसवर फक्त दाक्षिणात्य चित्रपटांचाच बोलबाला पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दमदार चित्रपट आणि वेबसिरीज येणार आहेत. जे समोर आलेल्या आकड्यांनुसार चांगलेच लोकप्रिय ठरले आहेत. हा सर्वे २४ मार्चपर्यंत समोर आलेल्या मतांवर आधारित आहे. यामध्ये जास्तीत जास्त दाक्षिणात्य चित्रपटांचीच नावे दिसत आहेत. पाहूया कोणते आहेत ते चित्रपट आणि यादी.

केजीएफ चॅप्टर २
दिग्दर्शक – प्रशांत नील
कलाकार – यश, संजय दत्त, रवीना टंडन

बीस्ट
दिग्दर्शक -नेल्सन दिलीप कुमार
कलाकार – थलपति विजय, पूजा हेगडे
प्रदर्शनाची तारीख – १४ एप्रिल, २०२२

अटॅक
दिग्दर्शक – लक्ष राज, आनंद
कलाकार – जॉन अब्राहम, रकुल प्रित सिंग
प्रदर्शनाची तारीख – १ एप्रिल २०२२

हिरोपंती २
दिग्दर्शक – अहमद खान
कलाकार – टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, नवाझुद्दिन सिद्दीकी
प्रदर्शनाची तारीख – २९ एप्रिल २०२२

रनवे ३४
दिग्दर्शक – अजय देवगण
कलाकार – अजय देवगण, अमिताभ बच्चन, रकुल प्रित सिंग
प्रदर्शनाची तारीख – २९ एप्रिल २०२२

वेब सिरीज – अभय
दिग्दर्शक – केन घोष
कलाकार – कुणाल खेमू
प्रदर्शनाची तारीख – ८ एप्रिल २०२२ ( जी ५)

कातु वाकुला रेंदु काधाल
दिग्दर्शक – विघ्नेश शिवन
कलाकार – विजय सेतुपति, नयनतारा, समंथा रुथ प्रभू
प्रदर्शनाची तारीख – २८ एप्रिल २०२२

आचार्य
दिग्दर्शक – कोरातला शिवा
कलाकार – चिरंजीवी, राम चरण, काजल अग्रवाल
प्रदर्शनाची तारीख – २९ एप्रिल २०२२

दसवीं
दिग्दर्शक – तुषार जलोटा
कलाकार – निमरत कौर, यामी गौतम, अभिषेक बच्चन
प्रदर्शनाची तारीख – ७ एप्रिल २०२२

गलवाकडी
दिग्दर्शकाचे नाव -शरण आर्ट
कलाकार – तरसेम जासर, वामिका गब्बी, बी. एन. शर्मा
प्रदर्शनाची तारीख – ८ एप्रिल २०२२

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा