युझवेंद्र चहलने पत्नी धनश्रीसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर; एकाच दिवसात फोटोला ८ लाखांपेक्षा अधिक लाईक्स

Indian Cricket Player Yuzvendra Chahals Romantic Style Made Headlines Spoke To His Wife Gori Teri Aankhen Kehte


भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक मजामस्ती करणारा, संघसहकाऱ्यांची खेचणारा, त्यांच्या फोटोंवर कमेंट करणारा खेळाडू म्हणजेच फिरकीपटू युझवेंंद्र चहल. या युवा खेळाडूने अनेकवेळा आपल्या जबरदस्त फिरकी गोलंदाजीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. आज तो भारतीय क्रिकेटची शान आहे. चहल नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आपल्या संघसहकाऱ्यांसह मजा मस्ती करतानाचे त्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत असतात. आता नुकतेच त्याने आपली पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. चाहत्यांनी त्याच्या या फोटोला पसंत केले आहे.

चहलने शेअर केलेल्या फोटोत ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालताना दिसत आहेत. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज खूपच भावला आहे.

चहलने फोटो शेअर करत लिहिले की, “गोरी तेरी आँखे कहे…” चाहत्यांना त्याचे प्रेम व्यक्त करण्याचा अंदाज खूप आवडला आहे. हे जोडपं सध्या एकमेकांसोबत वेळ घालवत आहे.

मागील वर्षी युझवेंद्र चहलने आपली गर्लफ्रेंड धनश्री वर्मा हिच्यासोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी लगीनगाठ बांधली होती. तेव्हा त्याच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल झाले होते. चहलने स्वत: आपल्या चाहत्यांना त्याच्या लग्नाची बातमी शेअर केली होती. त्याने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते.

खरंतर धनश्री वर्मा ही एक डॉक्टर आहे. परंतु ती केवळ डॉक्टरच नाही, तर ती एक कोरिओग्राफर आणि यूट्यूबरही आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास ३० लाख फॉलोवर्स आहेत. याव्यतिरिक्त धनश्रीचे फिटनेस व्हिडिओही सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. यूट्यूबवरही ती आपल्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ
-डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा
-वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय
-सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
-‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य
-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.