‘इंडियन आयडल १२’ मधील स्पर्धक सायली कांबळेने पैसे जमवून घेतले आईसाठी खास गिफ्ट; तुम्हीही म्हणाल, ‘मुलगी असावी तर अशी’

Indian idol 12 contestant sayli kamble gift saree to her mother


सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल 12.’ या शोमधील स्पर्धक, जज नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. स्पर्धकांच्या गायनाने तर प्रेक्षक भारावून जात असतात. त्यामुळे हा शो सगळीकडे मोठ्या संख्येने पाहिला जातो. हा शो आदित्य नारायण होस्ट करत आहे. त्यामुळे या शोला रंगत चढते. तसेच नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक हे तिघेही या शोला जज करत आहेत. या आठवड्यात इंडियन आयडलच्या मंच्यावर ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या शोमध्ये जल्लोष होणार आहे. या सोबत अजून एक कारण म्हणजे हा दिवस या शोमधील 50 वा एपिसोड असणार आहे. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी मंच्यावर खूपच आनंद पाहायला मिळणार आहे. तसेच सगळ्या स्पर्धकांचे शानदार परफॉर्मन्स देखील पाहायला मिळणार आहे.

इंडियन आयडल 12 मधील स्पर्धक सायली आणि अरुणिताने ‘अल्लाह ए अदा’ हे गाणे गायले, तेव्हा शोमध्ये सगळेच खूप खुश झाले. तीनही जजने तिचे कौतुक केले. त्यावेळी तिच्या आईबद्दल बोलताना तिने सांगितले की, एका स्त्रीसाठी गृहिणी होणं किती अवघड असतं. सायलीने सांगितले की, जेव्हा तिचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि जेव्हा तिला मंचावर पैसे देतात. तिने ते पैसे तसेच साठवून ठेऊन तिच्या आईसाठी एक साडी घेतली आहे.

सायलीने सांगितले की, “माझ्यासोबत प्रत्येक दिवशी माझ्या आईचा आशीर्वाद असतो. इंडियन आयडलच्या या प्रवासात तो माझा सर्वात मोठा आधार आहे. मला असे वाटते की, ती एक खंबीर गृहिणी आहे, जी नेहमीच माझी आणि माझ्या वडिलांची काळजी घेत असते. मी आज देवाचे आभार मानते की, मला एवढी चांगली आई मिळाली. जेव्हा मी या शोमध्ये चांगला परफॉर्मन्स देते, तेव्हा मला सगळे संगीतकार जे पैसे देतात. ते पैसे साठवून मी माझ्या आईसाठी एक महाराष्ट्रीयन साडी घेतली आहे. तिने आजपर्यंत माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिचे खूप खूप आभार.”

या आठवड्यातील या खास प्रसंगात गायक सुखविंदर सिंग हे देखील येणार आहेत. या शोमधील टॉप 9 स्पर्धक त्यांच्या समोर धमाल करताना दिसणार आहेत. या आधी ‘इंडियन आयडल 9’ मध्ये देखील सुखविंदर सिंग आले होते, तेव्हा त्यांना सलमान अलीचे गाणे एवढे आवडले होते की, त्यांनी त्याला त्यांच्या सोबत गाण्याची संधी देखील दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.