‘पैशांसाठी गेलो होतो’, किशोर कुमार यांच्या मुलाने सांगितले ‘इंडियन आयडल १२’ शोमध्ये जाण्यामागील कारण

Indian Idol 12 Legend Singer Kishore Kumar Son Amit Kumar Revealed He Was Told To Praise Contestants


टीव्हीवरील ‘इंडियन आयडल १२’ हा प्रसिद्ध शो प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक खास एपिसोड घेऊन येत असतो. शोमध्ये प्रत्येक आठवड्याला एक खास पाहुणे येतात आणि स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांचे मनोबलही वाढवतात. मागील आठवड्यात शोमध्ये दिग्गज गायक किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार गांगुली खास पाहुणे म्हणून आले होते. यामध्ये स्पर्धक आणि जजेसने किशोर कुमार यांनी ट्रिब्यूट दिला होता, जो अनेकांना आवडला नाही. त्यावर टीकाही केली जात आहे. आता यावर अमित कुमार गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनीही आपल्याला हा एपिसोड आवडला नसल्याचे सांगितले आहे.

टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना अमित कुमार गांगुलींनी म्हटले की, एपिसोडविरुद्ध होणाऱ्या टीकेबद्दल त्यांना माहिती आहे. सोबतच त्यांना निर्मात्यांकडून असे सांगण्यात आले होते की, सर्वांची प्रशंसा करायची आहे मग काहीही होवो. त्यांनी हेही मान्य केले की, ते या शोमध्ये आर्थिक कारणांमुळे गेले होते.

अमित यांनी म्हटले की, “मी तेच केले, जे मला करण्यास सांगितले होते. मला सांगण्यात आले होते की, सर्वांची प्रशंसा करायची आहे. कुणी कसेही गायले, तरीही त्यांची प्रशंसा करायची. कारण हे किशोर दा यांना ट्रिब्यूट दिले जात आहे. मला वाटले की, माझ्या वडिलांना श्रद्धांजली असेल. मी त्यांना आपल्या भागाची स्क्रिप्टही आधीच मागवली होती, परंतु असे काहीही झाले नाही.”

सांगितले ‘इंडियन आयडल १२’ मध्ये जाण्याचे कारण
जेव्हा अमित यांनी ‘इंडियन आयडल १२’ मध्ये जाण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, “सर्वांना पैशांची आवश्यकता असते. मी त्यांना जे पैसे मागितले, ते त्यांनी दिले. मग मी का नको जायला. मात्र, हरकत नाही. मी शो, जजेस आणि स्पर्धकांचा आदर करतो. अशाप्रकारच्या गोष्टी कधी कधी होतात.”

जज नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनीही किशोर दा यांची गाणी गायली. परंतु त्यांच्यावर टीका झाल्या. याबाबत बोलताना अमित यांनी म्हटले की, “मी या एपिसोडचा आनंद बिल्कुल लुटला नाही.”

किशोर कुमार हे चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गायकांपैकी एक आहेत. त्यांनी ‘एक लडकी भीगी भागी सी’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘मेरे सपनों की राणी’, ‘ये शाम मस्तानी’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी बंगाली, मराठी, गुजराती आणि भोजपुरी गाणीही गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.