पहिल्यांदाच बिकिनी घालून शर्मिला टागोर बनल्या होत्या ‘बिकिनी गर्ल’; तर आज ‘या’ अभिनेत्री बिकिनी घालून लावतात आग


आजच्या काळात तरुणाईमध्ये बिकिनी एक फॅशन स्टेटमेंट झाली आहे. चित्रपटांमध्ये सर्रास बिकिनी घातलेल्या अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात. अभिनेत्री, मॉडेल्स ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा बिकिनी घालतात. अभिनेत्रींना बिकिनीमध्ये चित्रपटात दाखवण्याचा ट्रेंड हा काय आता नाही सुरु झाला. जुन्या काळातही अनेक अभिनेत्रींनी बिकिनी घालून पडद्यावर आग लावली आहे.

लुईस लेअर्द या एका इंजिनियरने ५ जुलै १९४६ ला बिकिनी तयार केली. प्रशांत महासागरजवळ असलेल्या बिकिनी अटोल इथे या बिकीनीचा अविष्कार झाला. यामुळेच या ड्रेसला बिकिनी हे नाव पाडले. सुरुवातीला बिकिनीची जाहिरात करायला कोणी तयार नव्हते. मात्र जेव्हा बिकिनी जगासमोर आली, तेव्हा ती एक मोठे फॅशन स्टेटमेंट झाली. आज ५ जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय बिकिनी डे आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण बॉलिवूडमधील काही प्रसिद्धी आणि लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी पडद्यावर बिकिनी घालून धुमाकूळ माजवला होता.

शर्मिला टागोर
हिंदी चित्रपटांमध्ये पहिल्यांदा बिकिनी घालून हा ट्रेंड सेट केला, त्या पहिल्या बिकिनी गर्ल म्हणजे ‘शर्मिला टागोर’. शर्मिला टागोर यांनी १९६६ साली एका मासिकासाठी बिकिनी शूट केले होते. त्यांचे हे फोटो जेव्हा बाहेर आले तेव्हा ते खूपच प्रसिद्धी झाले होते.

दिशा पटानी
आजच्या पिढीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून बोल्ड ऍंड ब्युटीफुल अशा दिशा पटानीचे नाव सर्वात आधी येते. आपल्या मादक अदांनी आणि सौंदर्याने वेड लावणारी दिशा जवळपास तिच्या प्रत्येक सिनेमात बिकिनी लूकमध्ये दिसतेच.

आलिया भट्ट
बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी आलिया देखील चित्रपटांमध्ये बिकिनी सीन देताना दिसली. शिवाय ती तिच्या सुट्ट्या घालवताना देखील बिकिनीमध्ये दिसली आहे. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनन्या पांडे
‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ सिनेमातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या अनन्या पांडेचाही बिकिनी लूक खूप व्हायरल झाला होता. तिने तिच्या सुट्ट्यांच्या दरम्यान बिकिनी घालून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिची हटके असणारी सूर्यफुलाची डिझाइन असलेली बिकिनी देखील खूप गाजली होती.

क्रिती सेनन
अतिशय सुंदर असणारी क्रिती जरी चित्रपटांमध्ये बिकिनी सीनमध्ये दिसली नसली तरी तिने तिच्या सुट्ट्या साजऱ्या करताना स्विमवेयरमध्ये दिसते. याचे काही फोटो ती सोशल मीडियावरही पोस्ट करते.

दीपिका पदुकोण
हिंदी सिनेसृष्टीची मस्तानी असलेल्या दीपिकानेही अनेक चित्रपटांमध्ये बिकिनी घालून सीन दिले आहेत. शिवाय तिने बिकिनीमध्ये तिचे फोटोशूट देखील केले आहे. तिचे बिकिनी फोटो देखील खूप व्हायरल झाले होते.

अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माने देखील काही चित्रपटांमध्ये बिकिनी सीन दिले आहेत. सोबतच ती विराट कोहलीसोबत सुट्ट्या साजऱ्या करताना देखील बिकिनीमध्ये दिसली होती. तिच्या बिकिनीवरून अनेक मजेदार मिम्स देखील व्हायरल झाले होते.

जॅकलिन फर्नांडिस
श्रीलंकन ब्युटी असणारी जॅकलिन देखील बऱ्याच सिनेमांमध्ये बिकिनीमध्ये दिसली आहे. शिवाय तिने देखील बिकिनी घालून फोटोशूट केले आहे.

सनी लियोनी
बोल्ड अँड ब्युटीफुल असणारी सनी बऱ्याच सिनेमांमध्ये बिकिनी लूकमध्ये दिसली आहे. शिवाय नेहमी तिचे बिकिनी फोटोशूटचे फोटो व्हायरल होताना दिसतात.

मलायका अरोरा
आपल्या फिटनेसने सर्वाना अचंभित करणारी मलायका देखील नेहमी तिच्या बिकिनी फोटोमध्ये तिची फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसते.

कॅटरिना कैफ

 

कॅटरिना कैफ देखील चित्रपटांसोबतच तिच्या फोटोशूट आणि सुट्ट्यांच्या दरम्यान बिकिनीमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.