‘जय मल्हार’ मालिकेतील ‘बानुबया’ आठवतेय का? सध्याचे फोटो पाहून वेडे व्हाल


‘जय मल्हार’ (Jai Malhar) या मालिकेतील बानू आठवते का? हो तीच ती जिने म्हाळसानंतर खंडेरायांसोबत संसार थाटला. मालिकेमध्ये ही बानूची भूमिका अभिनेत्री ईशा केसकरने (Isha Keskar) साकारली होती. यातील तिच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा झाली होती. याद्वारे ईशा घराघरात पोहचली. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मालिकेत ती जितकी साधीसुधी होती, तितकीच ती खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. ती अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत असते. असेच तिचे काही ग्लॅमरस आणि हॉट फोटो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.

हे फोटो ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या अदा पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. अभिनेत्रीने यात काळ्या रंगाचा टॉप घातला आहे, ज्याच्यासोबत ती अतिशय दिलखेचक अशा पोझ देत आहे. हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत, जे बघता बघताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Isha keskar Shared most glamorous photo on social media)

तसेच काही दिवसांपूर्वी ईशाने एक फोटोशूट शेअर केले होते. यात तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे. तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीने यात निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, ज्यामध्ये ती एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाहीये. ओढणीसोबत दिलेल्या पोझ चाहत्यांना भुरळ पाडत आहेत.

हे फोटो ईशाच्या चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोला आतापर्यंत २० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर चाहते फोटोंच्या कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.

‘जय मल्हार’ मालिकेत बानूची भूमिका साकारून ईशाने चाहत्यांच्या मनात घर केलं. अखेरच्या वेळी ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navryachi Bayko) मालिकेत शनायाची भूमिका साकारताना दिसली होती. सोज्वळ भूमिकेत दिसणाऱ्या ईशाला अचानक ग्लॅमरस भूमिकेत बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!