Friday, March 29, 2024

भारीच ना! सिल्व्हिया झुका यांच्या पुस्तकावर आधारित असणारी ‘ही’ इटालियन वेबसिरीज प्रदर्शित

 

वेबसिरीज आल्या आणि मनोरंजनाला असलेल्या किंवा उरलेल्या सर्व सीमा देखील संपल्या. टेलिव्हिजनवरील मालिकांपेक्षा लहान आणि चित्रपटांपेक्षा जरा मोठ्या कलाकृतींसाठी वेबसिरीज हा उत्तम पर्याय आहे. मर्यादित भागांच्या या प्रकाराला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. आपल्याकडे वेबसिरीज बघण्यासाठी अनेक ऍप उपलब्ध त्या ऍपच्या माध्यमातून आपण वेबसिरीजचा आनंद घेऊ शकतो. पूर्वी आपण हिंदी, इंग्लिश आणि आपल्या परदेशीक भाषांमध्ये तयार होणाऱ्या वेबसिरीजच बघायचो मात्र आता आपण वेगवेगळ्या परदेशी भाषांमधील सिनेमे, सिरीज देखील सहज बघू शकतो.

बुधवार २७ ऑक्टोबर २०२१ रोजी बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशी, ‘ऍन ऍस्ट्रोलॉजिकल गाईड फॉर ब्रोकन हार्ट्स’ ही इटालियन सिरीज प्रदर्शित झाली आहे. हा या सिरीजचा पहिलाच भाग आहे. आपण बॉलिवूडमध्ये पाहिले तर अनेक सिनेमे, सिरीज, मालिका ह्या पुस्तकांवर आधारित असतात. पुस्तकांवर आधारित असणाऱ्या जवळपास सर्वच कलाकृती हिट झाल्याचे देखील दिसते. हा ट्रेंड फक्त भारतात आहे ,असे नाही जगभरातील जवळपास सर्वच मनोरंजन क्षेत्रात हा ट्रेंड पाहायला मिळतो. ‘ऍन ऍस्ट्रोलॉजिकल गाईड फॉर ब्रोकन हार्ट्स’ ही सिरीज देखील याच नावाच्या सिल्व्हिया झुका यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

रोमॅंटिक आणि कॉमेडी असणाऱ्या या सिरीजची प्रतीक्षा मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षकांना होती. ही इटालियन सिरीज आपण नेटफ्लिक्सवर इंग्लिश सबटायटलसोबत बघू शकतो. ही सिरीज ऍलिस नावाच्या महिलेवर आधारित असून जिचा प्रेमावर तर विश्वास आहे, मात्र तिला प्रेमात तिचे नशीब साथ देत नाही. ज्योतिषशास्त्रात पारंगत असणाऱ्या स्त्रीसोबत तिची मैत्री होते आणि ती ज्योतिषशास्त्रानुसार तिच्यासाठी योग्य असणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू करते. त्यानंतर तिच्या आयुष्यात एक एक पात्रांची एन्ट्री होते आणि ही कथा पुढे सरकते.

ज्या पुस्तकावरून ही सिरीज उचलली आहे, त्या पुस्तकाच्या लेखिका सिल्व्हिया झुका यांचे ‘ऍन ऍस्ट्रोलॉजिकल गाईड फॉर ब्रोकन हार्ट्स’ हे एकमेव आतापर्यंत प्रकाशित झालेले पुस्तक आहे. याचा अर्थ असा नाही की या सिरीजचा दुसरा भाग येणार नाही. जर या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला तर निर्माते नक्कीच दुसऱ्या भागाचा विचार करतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्हाला मारून टाकण्याच्या धमक्या येतायेत…’, पत्रकार परिषदेत क्रांतीने केला पती वानखेडेंच्या आरोपावर पलटवार

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा