जरा इकडे पाहा! ‘बबिता’शी असलेल्या अफेअरच्या चर्चांमध्ये ‘या’ विवाहित गायिकेसोबत ‘टप्पू’चा फोटो व्हायरल


‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने गेले १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच उच्च स्थानी असते. मालिकेतील प्रत्येक पात्राचे खास फॅन फॉलोविंग आहे. या मालिकेचे चाहते सगळ्याच कलाकारांना प्रेम देत असतात. मग ते या मालिकेतील मुख्य पात्र असो किंवा बालकलाकार. मागील काही दिवसांपासून बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही मालिकेत टप्पूचे पात्र निभावणारा राज अनादकटसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. त्या दोघांना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अशातच राजचा एक फोटो समोर आला आहे. तो एका सुंदर गायिकेसोबत दिसत आहे.

मुनमुन दत्तासोबत असलेल्या अफेअरच्या या चर्चांमध्ये राजचा जो फोटो व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही नक्कीच खुश व्हाल. या फोटोमध्ये त्याच्यासोबत बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आहे. राज नेहासोबत सेल्फी काढत असून तो खूपच खुश असल्याचे दिसत आहे. राजने निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. त्यांचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर सातत्याने त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Taarak Mehta ka ooltah chashmah tappu’s latest photo with neha Kakkar viral on social media)

नुकतेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील सगळे कलाकार अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ मध्ये गेले होते. यावेळी बिग बी आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ टीमने खूप मस्ती केली. त्यांच्या या खास एपिसोडचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही सगळ्या प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिका अत्यंत खुमासदार शैलीत प्रेक्षकांसमोर आणली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळते. प्रत्येक पात्रात काही ना काही खास गोष्ट आहे, ज्यामुळे त्यांची अशी एक खास आणि वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!