Sunday, May 19, 2024

देवमाणूस! रस्त्यावर गाणे म्हणत असणाऱ्या मकसूदचा आधार बनला सोनू सूद

प्रसिद्ध अभिनेता आणि देवमाणूस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद याने चित्रपटामध्ये जास्त तर खलनायकाच्या भूमिका साकारल्यात, पण तो खऱ्या आयुष्यामध्ये अभिनेता देवमाणसापेक्षा कमी नाही. त्याने कोरोनाकाळामध्ये जे केलं आहे त्यामुळे अनेक लोकांचा तो आधारस्तंभ बनला आहे .  लोकांनी त्याला आपला जिवणदाता देखिल म्हणलं आहे. त्यापैकीच मोहोम्मद मकसूद याचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मोहोम्मद मकसुद सुद हा दोन्ही पायांनी अपंग असून घर चालवण्यासाठी तो रस्तयावर बसून गाणे म्हणत असे. 2017 साली तो इंडियन आयडलच्या 24 व्या राउंडमध्ये तो पोहोचला होता. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्याने नोकरीची मागणी केली होती. तेव्हा सोनू सुद त्याला पटनाच्या एका शाळेमध्ये म्युजीक टिचर म्हणून काम देण्यात आले मात्र, आता मोहोम्मदला अभिनेत्याची ऑफर आवडली नाही असे वाटू लागले.

मोहोम्मदच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोनू सुदने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मकसूद भाई को नौकरी और रहने के लिए जगह का इंतजाम हो गया है। अब सड़क किनारे नहीं अपने घर पर गाना और सबको सिखाना’। असे म्हणत अभिनेत्याने त्याला ऑफर दिली होती मात्र, मकसुदने एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, सोनु सुदच्या ऑफिसववरुन मला कॉल आला होता. पटनाच्या एका शालेमध्ये माझ्या नोकरीची गोष्ट देखिल झाली होती मात्र, माझ्या पगाराबद्दल काहीच माहिती दिली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुंबूलला शालीनचे वेड; सलमान खानने रागवल्यानंतर ढसाढसा रडत ‘इमली’ म्हणाली, ‘मला घरी…’
धक्कादायक! अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रकृती खालावली, चाहत्यांनी लवकर बरे हाेण्यासाठी केली प्रार्थना

हे देखील वाचा