अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर बहुतकरून तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. जान्हवी सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असते. ती सतत तिचे सोशल मीडिया अकाऊंट अपडेट करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. जे इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा जान्हवी तिच्या पोस्टमुळे मीडियामध्ये गाजताना दिसत आहे. लवकरच जान्हवी मिस्टर अँड मिसेस माही सिनेमात दिसणार असल्याने सध्या तिने या सिनेमाशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जान्हवीने तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ सिनेमाची फोटोंमधून झलक दाखवली आहे. जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्यासोबत क्रिकेटर कार्तिक आर्यन देखील दिसत असून, दिनेश जान्हवीला फलंदाजीचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. तिने पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये जान्हवीने क्रिकेटचे हेल्मेट घालून खेळताना दिसत आहे, तर इतर फोटोंमध्ये ती चित्रपटाच्या टीमसोबत बसलेली दिसत आहे. तर दिनेश कार्तिक बॅटिंग करताना दिसत आहे.
हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा सिनेमा एका महिला क्रिकेटरवर आधारित असल्याचा अंदाज आता लावला जात आहे. या सिनेमात जान्हवी एका महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. एका फोटोमध्ये जान्हवी क्रिकेट किट पॅक करताना देखील दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “क्रिकेट कॅम्प मिस्टर अँड मिसेस माही.”
दरम्यान या सिनेमाची घोषणा करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केली होती. घोषणा झाल्यानंतर लोकांना काही अंशी लक्षात आले होते की, हा सिनेमा क्रिकेटवर आधारित असणार आहे. कारण करणने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेट कॉमेंट्री ऐकू येत होती. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा या यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’
‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन