जया बच्चन करणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर दणक्यात प्रवेश, ‘या’ वेबसीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला


बॉलिवूडमधील बच्चन कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असते. बच्चन कुटुंबातील जवळपास सगळेच चित्रपटसृष्टीत आहेत. केवळ अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिने वेगळे क्षेत्र निवडले आहे. त्यांच्या कुटुंबाचे चाहते देखील खूप आहेत. त्यांच्या कुटुंबाबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता जया बच्चन या देखील डिजिटल विश्वात प्रवेश करणार आहेत. अभिषेक बच्चनचे चित्रपट आणि वेब सीरिज देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झाला आहे. आता जया बच्चन देखील डिजिटल पदार्पण करण्यासाठी तयार झाल्या आहेत. (Jaya Bachchan will enter in digital platform with sadabahaar web series)

जया बच्चन या ‘सदाबहार’ वेबसीरिजमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर धमाल करण्यासाठी पूर्ण तयारीत आहेत. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, जया बच्चन यांनी या वेबसीरिजची शूटिंग फेब्रुवारी महिन्यात चालू केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही शूटिंग थांबवण्यात आली होती. आता जेव्हा परिस्थिती पूर्ववत झाली आहे, तर शूटिंग पुन्हा चालू केली आहे. सदाबहारच्या टीमने या आठवड्यात दोन सीक्वेन्सची शूटिंग पूर्ण केली आहे. कोरोनाचे सगळे नियम लक्षात घेता या वेबसीरिजची शूटिंग केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत झाली. शूटिंग करताना कलाकारांच्या सुरक्षिततेचे संपूर्ण काळजी घेतली गेली आहे.

परंतु अजूनही ही माहिती समोर आली नाही की, ही वेबसीरिज नक्की कोणत्या विषयवार आधारित असणार आहे. पण ही बातमी नक्की आहे की, या वेब सीरिजमध्ये जया बच्चन या महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. जया बच्चन या पूर्ण 5 वर्षानंतर पडद्यावर झळकणार आहेत. या आधी त्या शेवटच्या करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या ‘की ऍंड का’ या चित्रपटात दिसल्या होत्या. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. यानंतर त्या कोणत्याही चित्रपटात किंवा टीव्ही शोमध्ये दिसल्या नाहीत. परंतु राजकारणात त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

जया बच्चन यांनी ‘कभी खुशी कभी गम’, ‘शोले’, ‘सिलसिला’, ‘गुड्डी’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘कल हो ना हो’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’


Leave A Reply

Your email address will not be published.