Monday, May 27, 2024

‘वेड्यात काढलं जातंय…’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे अक्षय कुमारला जितेंद्र अव्हाड यांचा टोला

बॉलिवूडमधील खिलाडी म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार नुकतंच ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटामधून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये तो शिवाजी महाराजांची भूमिका स्वीकरात असून त्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, नेटकरी त्याला चांगलंच ट्रोल करत आहेत. यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र अव्हाड यांनी देखिल अभिनेत्यावर निशाणा साधला आहे.

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला अभिनय क्षेत्रामध्ये कोणत्याच ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकापासून आपल्या दमदार अभिनेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता नुकतांच मराठी इंडस्ट्रीमध्ये “वेडात मराठे वीर दौडले सात” ((Vedant Marathe Veer Daudale Saat) चित्रपटामधून पदार्पण करत आहे. त्याला आपण दरवेळेस पोलिस, कॉमेडी, आणि खिलाडी भूमिकेत पाहिले आहे मात्र, यावेळेस तो चक्क शिवाजी माहाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काही प्रेक्षकांना त्याची नवीन भूमिका फार आवडलेली दिसत नसून त्याला सतत ट्रोलिंगचा सामना कारावा लागत आहे.

नेटकऱ्यांसोबतच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक ट्वीट शेअर करुन “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटातील अक्षयच्या लूकवर टीका केली आहे. जितेंद्र यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ट्वीट शेअर करत लिहिले की, “जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातयं असं वाटतं.” अव्हाड यांच्या अशाप्रकारच्या ट्वीटने प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

अक्षय कुमार याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो शिवाजी महाराजाच्या भूमिकेत दिसून येत आहे. अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये “जय भवानी जय शिवाजी” असे लिहले आहे. मात्र, अक्षयला शिवाजी माहराजाच्या भूमिकेत पाहूण प्रेक्षक संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी केले असून अभिनेता प्रविण तरडे (Pravin Tarde), हार्दिक जोशी (Hardik Joshi), विशाल निकम (Vishal Nikam), हे कलाकारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘धोंडी चंप्याची लव्हस्टोरी’ पाहूण व्हाल लोटपोट, भरत जाधव नवीन चित्रपट
‘काळी राणी’ नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी

हे देखील वाचा