बॉलिवूडचा हिट आणि फिट अभिनेता जॉन अब्राहमने आपल्या अभिनयाच्या जोरावर जबरदस्त प्रसिद्धी मिळवली आहे. तो सध्या आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाबाबत चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने नुकतेच आपल्या या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा ऍक्शन करताना दिसणार आहे. तसेच आता तो आपल्या आणखी एका आगामी ‘अटॅक’ चित्रपटावर काम करत आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यावर त्याला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे.
अभिनेता जॉन अब्राहमने बुधवारी (१० फेब्रुवारी) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या ‘अटॅक’ चित्रपटातील बाईक स्टंटचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो बाईक चालवताना दिसत आहे आणि त्याची कॅमेरा टीम शूटिंग करत आहे. परंतु बाईक चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
जॉनने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “स्टंटिंग, ऍक्शन, बाईक्स, अटॅक.”
त्याच्या या व्हिडिओवर एका युझरने प्रतिक्रिया देत म्हटले की, “नो सेफ्टी.” दुसऱ्या एका युझरने लिहिले की, “जॉन अब्राहम कृपया करून हेल्मेट घाल.”
याव्यतिरिक्त त्याच्या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. इंटरनेटवर जॉनचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ‘अटॅक’ सिनेमाचे काही सीनसाठी जॉन या महिन्यात नवी दिल्लीमध्ये शूटिंग करणार आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटानंतर जॉन आपल्या पुढच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंगही सुरू करणार आहे. चित्रपट ‘पठाण’मध्ये त्याच्यासोबत शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित करणार आहेत.
जॉनने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात ‘जिस्म’ चित्रपटातून केली होती. जो एक थ्रिलर चित्रपट होता. त्यानंतर त्याने ‘साया’, ‘ऐतबार’, ‘पाप’, ‘लकीर’, ‘धूम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ
-डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा
-वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय
-सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
-‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य
-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज