बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला बाईक्सचे किती वेड आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. अभिनेत्याने सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये आपली बाईकसोबत ओळख निर्माण केली आहे. आजही जॉनप्रमाणे अनेक कलाकार आपल्या सुपर बाईकवरुन बर्याचदा मुंबईत फिरताना दिसतात. याच बाबतीत जॉनवर एकदा अपघाताचा गुन्हा नोंदवला गेला होता. 2006 मध्ये जॉनवर वेगवान आणि बेपर्वाईने वाहन चालविण्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सन 2006 मध्ये जॉन अब्राहमने वेगवान गाडी चालवत दोन जणांना धडक दिली होती. या अपघातात वाटेवर असलेले लोकांना किंचित जखमही झाली होती. यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम 279 (सार्वजनिक ठिकाणी वेगवान वाहन चालविणे) आणि 337 (इतरांच्या जीवाला धोका पोहोचवणारी किंवा इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेला इजा पोहोचविणारी कारवाई) अशी नोंद केली होती. जॉनने कोर्टाला सांगितले की, ‘ज्या लोकांना दुखापत झाली आहे, त्यांनी या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तो एक छोटा अपघात होता.’ कोर्टाने 2010 मध्ये जॉनला 15 दिवसाची तुरुंगाची शिक्षा सुनावली होती.
पण जॉनने हार मानली नाही आणि त्याने या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या जामिनासाठी मागणी केली होती. जॉनला येथून दिलासा मिळाला होता. याप्रकरणी हायकोर्टाचे न्यायाधीश आर.सी. चव्हाण यांनी जॉनच्या सुटकेचे आदेश दिले होते. यासह, त्याला 20,000 रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले होते.
आपल्या निर्णयामध्ये कोर्टाने म्हटले होते की, ‘पीडितांना फक्त साध्या जखमा झाल्या आहेत, आणि आरोपी संपूर्ण जामिनावर राहिला आहे, याची जाणीव ठेवून त्याला जामिनावर सोडले जाऊ शकते.’ या संपूर्ण अपघातानंतर जॉन अब्राहम स्वत: पीडितांना दवाखान्यात घेऊन गेला होता. ही बाब 2006 ची होती, परंतु या प्रकरणात निर्णय 2012 मध्ये आला होता.
जॉन अब्राहमचे नाव बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांमध्ये घेतले जाते. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. जॉनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता लवकरच त्याच्या ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटात दिसणार आहे. यासह हा अभिनेता शाहरुख खानसमवेत ‘पठाण’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॉनसोबत दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. असे म्हटले जात आहे की, आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल, कारण कोरोनामुळे आऊटडोअर शूटिंग संपूर्ण भारतभर थांबविण्यात आली आहे. (john abraham was speeding his hayabusa when he lost control and injured two pedestrians)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मजबूत जॉन अमिताभ यांच्याशी बोलताना लागला रडू, अभिनेत्याला पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात तरळले अश्रू
शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉन अब्राहमने वाजवली होती चाहत्याच्या कानाखाली; पण काय होतं कारण?










