Saturday, April 18, 2026
Home हॉलीवूड धक्कादायक! घरगुती हिंसाचाराची शिकार बनली ‘ही’ हॉलिवूड अभिनेत्री, फोटो पाहून पाणावतील डोळे

धक्कादायक! घरगुती हिंसाचाराची शिकार बनली ‘ही’ हॉलिवूड अभिनेत्री, फोटो पाहून पाणावतील डोळे

चित्रपट कलाकारांच्या घरगुती हिंसाचाराची प्रकरणे वाढत आहे. अशातच आता पुढचे नाव येते फ्रेंच अभिनेत्री ज्युडिथ चेमला (Judith Chemla). अलीकडेच, ज्युडिथ केमलाने तिच्यासोबतच्या घरगुती हिंसाचाराचे काही हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकंच नाही, तर ज्युडिथ केमलाने तिचा पूर्व पार्टनर तिला कसा मारहाण करायचा हेही सांगितलं आहे. 

ज्युडिथ केमलाने व्यक्त केल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या वेदना
ज्युडिथ केमलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेले फोटो गेल्या वर्षीचे आहेत. अशा स्थितीत, ज्युडिथ केमलाने आपण घरगुती हिंसाचाराला बळी पडल्याचा खुलासा केला आहे. ज्युडिथ केमलाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्या पूर्व जोडीजाराने मला खूप मारहाण केली होती. ही फोटो त्या हिंसाचाराची साक्षीदार आहेत. एका वर्षात माझ्यासोबत हे तिसर्‍यांदा घडले आहे. मी तिसऱ्यांदा पोलिसांकडे जावे का? आता मी स्पष्टपणे त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करेन आणि तो आता माझ्या मुलीसमोर गुन्हेगार असेल.” मात्र ज्युडिथ केमलाने या पोस्टमध्ये तिच्या एक्सचे नाव उघड केले नाही. (judith chemla victim of domestic violence abuse)

ज्युडिथ चेमलाच्या फोटोमध्ये दिसतायेत मारल्याच्या खुणा
ज्युडिथ चेमलाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर तुमचा आत्मा हादरेल. ज्युडिथ केमलाच्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर किती जखमा आहेत, हे तुम्ही सहज पाहू शकता. चेहऱ्याला कट, सुजलेले डोळे आणि रक्ताने माखलेला चेहरा पाहून घाबरून जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, त्याच्या एक्सने अभिनेत्रीशी किती गैरवर्तन केले असेल याचा अंदाज सहजपणे लावला जाऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा