एकेकाळी एमएस धोनीसोबत नाव जोडलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे नवे फोटोशूट घालतंय सोशल मीडियावर धुमाकूळ

Julie Actress Raai Laxmi Turns Up Heat On Social Media With Mesmerizing Pics With Former Indian Cricketer MS Dhoni South Bhojpuri Mogi


अनेक अभिनेत्रींशी भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंबद्दल नावे जोडलेली आपण पाहिलं आहे. त्यामध्ये दक्षिण भारतीय अभिनेत्री राय लक्ष्मी हिचाही समावेश आहे. तसेच लक्ष्मीचे नाव एकेकाळी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीशी जोडले गेले होते. एका मुलाखतीत स्वत: राय लक्ष्मीने हे कबूल केले होते. अभिनयाबरोबरच लक्ष्मी तिच्या सौंदर्याबद्दल देखील चर्चेत असते. अलीकडेच लक्ष्मीने लेटेस्ट फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

डेनिम लूकमध्ये लक्ष्मीचे हे फोटो एक मोहक लूक देत आहेत. राय लक्ष्मी तिच्या आकर्षक शैलीने बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींना टक्कर देऊ शकते, असे तिचे नुकतेच पोस्ट झालेले फोटो बघून वाटते.

लक्ष्मीने सांगितले की, ती धोनीशी पाच वर्षांपर्यंत रिलेशनशीपमध्ये होती. या नात्याने तिच्या कारकीर्दीत काही फरक पडला आहे का असे जेव्हा लक्ष्मी रायला विचारले गेले, तेव्हा ती म्हणाली की, ‘यामुळे तिच्या कारकीर्दीत काही फरक पडला नाही, परंतु ते नाते कायम माझ्या अस्मितेशी जोडले गेले.’

तथापि, ‘जुली 2’ फेम राय लक्ष्मी आता आपला भूतकाळ विसरली आहे आणि पुढे गेली आहे. सध्या तिच्याकडे बऱ्याच चित्रपटाच्या ऑफर आहेत. लक्ष्मीकडे सध्या ‘आनंद भैरवी’, ‘गँगस्टर 21’, ‘निलावू’, ‘सिंड्रेला’सारखे अनेक प्रोजेक्ट आहेत. तसेच, लक्ष्मीने ‘अकिरा’ आणि ‘ऑफिसर अर्जुन सिंग आयपीएस बॅच 2000’ या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

अभिनयाशिवाय लक्ष्मी तिच्या बोल्ड आणि सिझलिंग लुकसाठीही चर्चेत असते. लक्ष्मी आकर्षक दिसण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळून मेहनत करत असते.

तिच्या या डेडिकेशनमुळे चाहते तिला खूप पसंत करतात. वारंवार ती तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ शेअर करत असते.

तिचे चाहतेही तिच्या पोस्टला नेहमी प्रतिक्रिया देत असतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.