दिलीप कुमारांच्या निधनानंतर नीतु कपूर यांनी साजरा केला वाढदिवस; निशाणा साधत केआरके म्हणाला, ‘त्यांना इज्जत…’


सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर कोणीही त्यांचे मत अगदी बिनधास्तपणे संपूर्ण स्वतंत्र ठेऊन व्यक्त करू शकतात. या गोष्टींचा अनेक युजर्स गैरफायदा घेतात, तर काही यांचा चांगला उपयोग करून घेतात. बिग बॉसचा एक्स स्पर्धक असलेला आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक असलेला व्यक्ती म्हणजे कमाल आर खान उर्फ केआरके. केआरके हा नेहमी त्याच्या कामापेक्षा त्याच्या विवादित सोशल मीडियावरील पोस्टसाठीच ओळखला जातो. कलाकारांशी स्वतःहून पंगा घेण्यामध्ये केआरकेचा मोठा हातखंडा आहे. नुकतेच बॉलिवूडमधील महान कलाकार दिलीप कुमारांचे निधन झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री नीतु कपूर यांनी त्यांचा वाढदिवस देखील साजरा केला. या वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.

नेहमी विवादित ट्वीट करणाऱ्या केआरकेने आता कपूर घरावर निशाणा साधला आहे. त्याने एक ट्वीट करत म्हटले आहे की, “सकाळी दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यांना संध्याकाळी ५ च्या सुमारास दफन करण्यात आले आणि रात्री ९ वाजता बॉलिवूडने नीतु कपूर यांचा वाढदिवस साजरा करत पार्टीचा आनंद लुटला. मी असे म्हणत नाही, की नीतु चुकीच्या आहेत किंवा त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करायला नको. मात्र जर तुम्ही दिलीप साहेबांना आदर देत नसाल, तर इतर कोणी कसे देईल?”

केआरकेचे हे ट्वीट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याला पाठिंबा देत ‘हे एक कटू सत्य आहे मित्रा’ असे म्हटले आहे. तर काहींनी ‘एका मोठ्या आणि महान कलाकारासाठी कलाकार एक दिवसाचा शोक देखील पाळू शकत नाही का?’ असा सवाल विचारला आहे. तर काहींनी केआरकेला चुकीचे म्हणत लिहिले की, ‘दिलीप साहेबानी त्यांचे संपूर्ण आयुष्य जगले होते. त्यांच्या जाण्याने दुःख व्हायला नको.’ तर एकाने लिहिले, ‘काहीही फरक पडत नाही.’

मागील बऱ्याच काळापासून केआरके सलमान खानवर केलेल्या आरोपांमुळे खूपच चर्चेत आला होता. त्याच्या पोस्ट, व्हिडिओ, समीक्षण आदी अनेक गोष्टींमुळे आणि त्याने सलमानची समाजातील प्रतिमा खराब केल्याचे सांगत त्याच्यावर सलमान खानने त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळे कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर, केआरकेने सलमान खान विरोधात पोस्ट केलेले सर्व व्हिडीओ डिलीट केले.

एवढे होऊनही तो शांत बसला नाही. त्यानंतर त्याने शाहरुख खान, कंगना रणौत, विद्या बालन यांच्यावर देखील ट्वीट करत त्यांच्याशी पंगा घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.