Thursday, March 30, 2023

पंगा क्वीनने उधळली दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकावर स्तुतीसुमने म्हणाली, ‘मी रोजच तिच्या…’

सध्या साऊथ चित्रपटांचा प्रचंड मोठा बोलबाला संपूर्ण देशात आहे. हे सिनेमे यातील कलाकार सर्वच तुफान गाजतात मात्र तसे पाहिले तर अभिनेत्यांच्या बाबतीत अभिनेत्रींना तशी जास्त प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. साऊथमधील अनेक अभिनेत्री अतिशय प्रतिभावान असून त्यांची साऊथ इंडस्ट्रीवर मोठी पकड आहे. साऊथमधील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ज्योतिका सरवन. ज्योतिकाने तिच्या प्रतिभेच्या जोरावर साऊथमध्ये मोठ्या प्रमाणावर नावलौकिक मिळवला. साऊथच्या अनेक मोठया कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्योतिकाने मेगास्टार राजनीकांतसोबत काम करत त्याचा ‘चंद्रमुखी’ सिनेमा गाजवला. अतिशय दमदार अभिनेत्री म्हणून ज्योतिकाचे नाव घेतले जाते. अनेकांनी तिची भरभरून स्तुती केली आहे. यातच आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने देखील आता तिची सोशल मीडियावर स्तुती केली आहे.

कंगना रणौतने ज्योतिकाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्यावर स्तुती सुमने उधळली आहे. कंगनाने ज्योतिकाची पोस्ट केलेली मुलाखत २०१९ सालातली असून, तिचा व्हिडिओ पंगा क्वीनने रिपोस्ट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना तिने लिहिले, “हे खूपच उत्साह वाढवणारे आहे. खरंतर मी रोजच चंद्रमुखी सिनेमात ज्योतिकाच्या दमदार अभिनयाला बघत आहे. कारण आम्ही चंद्रमुखी २ सिनेमाची शूटिंग करत आहे.”

तत्पूर्वी चंद्रमुखी हा २००५ साली आलेला एक तामिळ हॉरर ड्रामा सिनेमा होता. या सिनेमात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते. चंद्रमुखी हा सिनेमा २००४ साली आलेल्या आप्तमित्र या कन्नड सिनेमाचा रिमेक होता. तर आप्तमित्र हा सिनेमा १९९३ साली आलेल्या मणिचित्राथजु या मल्याळम सिनेमाचा रिमेक होती.

या सिनेमाची कथा एका एनआरआय कपलच्या अवतीभोवती फिरते. जे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या परंपरागत घरात राहिला येतात. जिथे त्यांच्यासोबत अनेक विचित्र विचित्र घटना घडतात. ते पुढे यातून कसे मार्ग काढतात? नक्की त्या घरात काय असते? आदी अनेक गोष्टीबद्दल माहिती सिनेमा पाहून येईल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पाकिस्तानमधील दिग्गज अभिनेते जिया मोहिउद्दीन यांचे दुःखद निधन

हे देखील वाचा