मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा कंगनाची पोस्ट व्हायरल झाली आहे. यामध्ये ती राहुल गांधींना टोमणे मारताना दिसत आहे. कंगनाने (Kangan Ranaut) तिच्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये लोकसभेत राहुल गांधींच्या जातीसंबंधित वक्तव्याचा समाचार घेतला आहे. खरे तर नुकतेच राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांच्यावर शिवीगाळ आणि अपमान केल्याचा आरोप केला होता. आता कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर राहुल गांधींचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते लोकांना जात विचारताना दिसत आहेत.
कंगना राणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एकामागून एक अनेक पोस्ट शेअर केल्या. पहिल्या पोस्टमध्ये तिने राहुल गांधींवर टोमणे मारत ‘विरोधकांचा दुटप्पी चेहरा’ असे लिहिले आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव जातीबाबत प्रश्न विचारल्यानंतर संतापलेले दिसत आहेत. व्हिडिओसोबत कंगनाने लिहिले आहे की, ‘स्वतःच्या जातीबद्दल काहीही माहिती नाही. नानू मुस्लीम, आजी पारशी, आई ख्रिश्चन आणि तुम्ही जणू काही पास्ता मध्ये कढीपत्ता घालून खिचडी बनवण्याचा प्रयत्न केल्या सारखे आहात आणि तुम्हाला प्रत्येकाची जात शोधायची आहे. एवढ्या उद्धटपणे, अपमानास्पद पद्धतीने तुम्ही जाहीरपणे लोकांना त्यांची जात कशी काय विचारू शकता ?
याशिवाय, तीने आणखी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक कोट शेअर केला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘नार्सिसिस्टला राजाच्या अधिकाराची अपेक्षा असते, तर त्याच्याकडे मुलाइतकी वाच्यता असते’. याला राहुल गांधींशी जोडत कंगनाने लिहिले आहे की, ‘हे मला राहुल गांधींची आठवण करून देते… हा हा हा त्यांना राजा व्हायचे आहे पण त्यांचे डोके लहान मुलासारखे आहे पण जेव्हा आपण विचार करतो (महामारी, सीमा, अर्थव्यवस्था इत्यादी, तेव्हा राजाचे हक्क आणि राजाची जबाबदारी त्याबद्दल आपल्या मनात कोण येतं?
कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये एक मीम शेअर केला आहे. त्यात काजोलचा फोटो आणि तिच्या ‘जाती हूं मैं’ या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये राहुल गांधींचा फोटो असून त्यावर ‘कोणती जात प्रिये?’
खरे तर राहुल गांधी यांनी मंगळवारी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांच्या जातीवर भाष्य करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. अनुराग ठाकूर म्हणाले होते, ‘ज्यांना स्वतःची जात माहित नाही ते जात जनगणनेबद्दल बोलत आहेत’. नंतर अनुराग ठाकूर म्हणाले, ‘मी म्हणालो होतो की ज्यांची जात माहित नाही ते जात जनगणनेवर बोलत आहेत, पण मी कोणाचे नाव घेतले नाही.’
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अनुपम खेर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
‘तुम्ही ‘बिग बॉस मराठी 5’ का होस्ट करत नाही?; महेश मांजरेकरांनी सांगितले मोठे कारण