‘सीता’ चित्रपटातून हटवले करीना कपूरचे नाव, ‘ही’ अभिनेत्री निभावू शकते सीतेची भूमिका


बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून एका चित्रपटाची चर्चा सातत्याने चालू होती तो चित्रपट म्हणजे ‘सीता’ होय. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटात करीना कपूर खान ही काम करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाबाबत असे म्हटले जात होते की, या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी करीना कपूरने 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण आता अशी माहिती समोर आली आहे की, करीना कपूरचा या चित्रपटासंबंधित कोणाशीही संपर्क झालेला नाहीये. (Kareena Kapoor’s name remove from film sita, this actress may enter)

यातच प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर केवी विजयेंद्र प्रसाद यांनी चित्रपटातील अभिनेत्रीबाबत त्यांची पसंती सांगितली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सीता या चित्रपटाचे स्क्रिप्ट रायटर केवी विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी कंगना रणौतला पसंती दर्शवली आहे.

काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की, केवी प्रसाद यांनी या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट आणि करीना कपूर यांचे नाव सुचवले आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “माझ्या माहितीनुसार, मला नाही आठवत की, मी सीतेच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीचे नाव घेतले आहे. आम्ही आता स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली आहे. एकदा ते काम पूर्ण झाले की, मग आम्ही अभिनेत्रीचा शोध घेणार आहोत. या चित्रपटात सीतेचे रामाशी लग्न होण्यापूर्वीचे आयुष्य दाखवले जाणार आहे.”

केवी प्रसाद हे दिग्दर्शक एसएम राजामौली यांचे वडील आहेत. त्यांनी ‘बाहुबली सीरिज’, ‘बजरंगी भाईजान’, ‘मणिकर्णिका’, ‘थलायवी’ यांसारख्या चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिली आहे. तसेच ते आता ‘सीता’ या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहित आहेत. हा चित्रपट हिंदी सोबतच तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केली नवीन मोबाईल गेमची घोषणा; सोशल मीडियावरून दिली माहिती

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’


Leave A Reply

Your email address will not be published.