Wednesday, March 22, 2023

‘माझ्यासोब गेम खेळतेय किम कार्दशियन!’ पीट डेव्हिडसनला किस करताना पाहून संतापला कान्ये वेस्ट

किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि कॉमेडियन पीट डेव्हिडसन (Pete Davidson) यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून बातम्या येत आहेत की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकत्र दिसले आहे. अशातच डेव्हिडसन आणि किम दोघेही ऑन-स्क्रीन किस करताना दिसले. त्याचवेळी दोघेही रोमँटिक अंदाजात एकमेकांचा हात धरताना दिसले. यावर आता कान्ये वेस्टची (Kanye West) प्रतिक्रिया समोर आली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ४१ वर्षीय किम कार्दशियनने एसएनएलवर डेव्हिडसनला किस केले होते. यावेळी किम आणि डेव्हिडसन अमेरिकन लेट-नाईट लाइव्ह टेलिव्हिजन होस्ट करत होते.

जेव्हा किम-डेव्हिडसन बनले अलादीन-जॅस्मिन
डेव्हिडसन अलादीन आणि किम जॅस्मिनच्या भूमिकेत दिसली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांना किस केले होते. अलीकडेच कान्ये वेस्टने एका मुलाखतीत सांगितले की, किम कार्दशियन हे जाणूनबुजून करत आहे आणि गेम खेळत आहे. ४४ वर्षीय रॅपरने हॉलिवूड अनलॉकच्या जेसन लीला सांगितले की, सॅटरडे नाईट लाइव्ह सेगमेंट दरम्यान ४१ वर्षीय किम कार्दशियनने २८ वर्षीय डेव्हिडसनला किस केली. त्यावेळी तो खूप संतापला होता. त्यावेळी किम पहिल्यांदाच शो होस्ट करत होती.

कान्ये वेस्ट रागात म्हणाला…
माध्यमांतील वृत्तानुसार, वेस्ट त्यावेळी प्रेक्षकांमध्ये होता आणि गर्दीतून हे सर्व पाहत होता. तो म्हणाला की, “तुम्ही मला अशा एसएनएलवर कसे घेऊन जाऊ शकता आणि नंतर माझ्यासमोर त्या व्यक्तीला किस करू शकता ज्याला तुम्ही त्यावेळी डेट करत होता? तू हे सगळं माझ्यासमोर कसं करू शकतेस?” तो पुढे म्हणाला की, “ती मीडियामध्ये असे विनोद करू शकतो. ती अशा कथांची आखणी करू शकतो. ती करार तोडू शकते आणि सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकते. पण मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगेल की, माझ्या मुलांशी खेळू नको.”

नोव्हेंबर २०२१ मध्ये, डेव्हिडसन आणि किम दोघेही अनेकदा एकत्र हँग आउट करताना आणि एकमेकांचा हात धरताना दिसले. अशा परिस्थितीत दोघेही रिलेशनशिपमध्ये आल्याचा अंदाज चाहत्यांना आला.

हेही वाचा :

हे देखील वाचा