Thursday, March 28, 2024

‘सामी सामी’ची जादू सीमेच्या पल्ल्याडही! किली पॉलने लावले हिट गाण्यावर ठुमके

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ चित्रपट रिलीझ झाल्यापासून यशाचे अनेक विक्रम बनवत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाची कथा आणि गाणी सगळीकडे अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. आता या चित्रपटाच्या ‘सामी-सामी’ या सुपरहिट गाण्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टांझानियन मुलगा किली पॉल (Kili Paul) रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन यांच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओची सर्वत्र धमाल!
टांझानियाची प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार किली पॉलचा लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. खरं तर, रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्यावर ज्या पद्धतीने नाचत आहे, त्याच पद्धतीने किली पॉलही या गाण्यावर जबरदस्त ठुमके लावताना दिसत आहे. त्याची डान्सिंग स्टाईल पाहून सोशल मीडिया युजर्सही थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये किली नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक मसाई पोशाखात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

‘सामी-सामी’ गाण्यावर केली हूक स्टेप
किली या गाण्यावर अतिशय मस्त स्टाईलमध्ये डान्स करत आहे. या गाण्यावर त्याने हुक स्टेपही केली. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. किलीचा हा व्हिडिओ ऍमेझॉन प्राइमनेही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

किलीच्या या डान्स स्टेप्सवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांनी त्याच्या डान्स व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “किलीने रश्मिका मंदानापेक्षा चांगला डान्स केला आहे.” यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, रश्मिका आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट आणि त्यातील गाणी परदेशातही चांगलीच पसंत केली जात आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा