राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र यांचा खूप जुना संबंध आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश करत हे क्षेत्र देखील गाजवले आहे. राजेश खन्नांपासून ते शत्रुघ्न सिन्हा आणि गोविंदापर्यंत अनेकांनी मोठ्या पडद्यासोबतच राजकारणाचे मैदान देखील गाजवले आहे. या यादीत बॉलिवूडचे ‘दा’ म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांची देखील भर पडली आहे. मार्च महिन्यात पश्चिम बंगालच्या निवडणुकांआधी मिथुनदांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
या प्रवेशानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भडकाऊ भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि याविरोधात मानिकतल्ला पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार देखील नोंदवण्यात आली. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सांगण्यात आले की, मिथुनदा यांनी प्रचार रॅलींमध्ये बंगाली भाषेत ‘‘मारबो एकहने लाश पोरबे शोशाने” (तुम्हाला मारले तर तुमचे प्रेत स्मशानात पडेल) आणि “एक छोबोले चाबी” (सापाचा दंश झाला तर तुम्ही थेट फोटोत अडकाल) असे म्हटले होते.
या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच २ मे नंतर बंगालमध्ये ज्या दंगली झाल्या, त्या दंगलींना मिथुनदा यांनी म्हटलेले संवाद देखील कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला.
निवणुकांच्या निकालानंतर १ महिन्याने मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या प्राथमिक तक्रारीला रद्द करावे अशा आशयाची याचिका कोलकाता हायकोर्टात दाखल केली होती.
Actor & BJP leader Mithun Chakraborty is being questioned virtually by Kolkata Police over his controversial speech during election campaigning for West Bengal polls. An FIR was registered in Maniktala for his speech.
(File photo) pic.twitter.com/SY9eQyXkTz
— ANI (@ANI) June 16, 2021
यानंतर कोलकाता हायकोर्टाने मिथुनदा यांना आदेश दिला होता की, त्यांनी पोलिसांना त्यांचा ई-मेल आयडी द्यावा, जेणेकरून हिंसा भडकवण्याचा आरोप केलेल्या तक्रारींवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची चौकशी करण्यात येईल. मिथुनदा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना तपास अधिकाऱ्यांना या सुनावणीसाठी मिथुनदांना योग्यवेळी द्यावी, ज्यावेळेस ते उपस्थित राहतील.
आज मिथुनदांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची चौकशी करण्यात आली. जवळपास ४५ मिनिटे झालेल्या या चौकशी दरम्यान मिथुनदांनी सांगितले की, त्यांनी म्हटलेले संवाद हे फक्त हास्य-विनोदासाठी होते. त्याचा या हिंसेशी काहीही संबंध नसून ते निर्दोष असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चक्क पाण्यात झोपून दिली तिने पोझ; चाहत्यांना पाहायला मिळाली पूजा सावंतची ‘हॉट अन् हटके’ स्टाईल