बहीण कृष्णा श्रॉफने केला टायगर अन् दिशाच्या नात्याचा खुलासा; सांगितले, कसे आहे नाते?


बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनत असतो. कधी त्याच्या फिटनेसमुळे, तर कधी त्याच्या रिलेशनमुळे तो चर्चेत असतो. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्या दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट केले आहे. कधी डिनरला, तर कधी नाईट आऊटला ते एकमेकांसोबत दिसतात. परंतु त्यांनी अजूनही त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही. परंतु टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने दिशासोबत असलेल्या नात्याबाबत सांगितले आहे.

कृष्णाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी जेव्हा एकमेकांसोबत असतात, तेव्हा कोणीच बोर होत नाही. दिशा आणि कृष्णा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्या एकमेकांच्या पोस्टवर मजेशीर कमेंट करत असतात. त्या दोघी अनेकवेळा एकमेकींसोबत वेळ घालवत असतात. कृष्णा आणि टायगरने मिळून दिशाचा वाढदिवस साजरा केला होता. (Krishana Shroff revealed relation of tiger Shroff and disha patani)

टायगर आणि दिशाच्या रिलेशनबाबत बोलताना कृष्णाने सांगितले की, “आम्ही जेव्हा भेटतो, तेव्हा तिथे फक्त मजा मस्करी होत असते. त्यावेळी कोणताच सीरियस किंवा बोरिंग विषय नसतो. हे खूप कूल आहे. मी खुश आहे माझ्या भावाकडे फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, क्लोज फ्रेंड किंवा त्याला या नात्याला जे नाव द्यायचे आहे ते. पण त्याच्याकडे स्पेशल व्यक्ती आहे. त्याला खुश बघून मला खूप आनंद होतो. तो तिच्यासोबत खूप खुश असतो. इंडस्ट्रीमध्ये हे खूप कठीण आहे.”

तिने पुढे सांगितले की, “जोपर्यंत ते दोघे एकत्र आहेत. तोपर्यंत ते दोघे खुश दिसणार आहेत. आम्ही सोबत खूप चांगला वेळ घालवतो. मला माझ्या भावाला खुश बघायचे आहे. तो खुश तर मी खुश.”

मागील महिन्यात जॅकी श्रॉफ यांनी सांगितले होते की, “माझा मुलगा टायगरने 25 वर्षांचा असल्यापासून डेट करण्यास सुरुवात केली आहे आणि तो खूप खुश आहे. मला माहित नाही की, त्याने त्याच्या भविष्याबाबत काय निर्णय घेतला आहे. पण मला ही गोष्ट खूप चांगली माहित आहे की, तो त्याच्या कामाबाबत खूप फोकस आहे. मला असे वाटते की, त्याच्यासाठी त्याची आई, वडील, बहीण आणि गर्लफ्रेंड यांच्यापेक्षा काम महत्वाचे आहे. कोणीही त्याच्या कामामध्ये येऊ शकत नाही. तो त्याच्या कामाबाबत खूप फोकस आहे. याचा मला खूप आनंद आहे.”

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा ही सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते. ती नेहमीच तिचे जिममधील वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडतात. काही दिवसांपूर्वी कृष्णा तिच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.