Thursday, January 16, 2025
Home अन्य क्रितीच्या कथित स्मोकिंग व्हिडिओवरून झालेल्या गदारोळात, आईची ही जुनी पोस्ट व्हायरल

क्रितीच्या कथित स्मोकिंग व्हिडिओवरून झालेल्या गदारोळात, आईची ही जुनी पोस्ट व्हायरल

क्रिती सेननची (Kriti Senon) गणना बॅालीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीमध्ये केली जाते. सध्या ती एकाच वेगळ्या कारणांमूळे चर्चेत आली आहे. तीचा एक व्हिडिओ सोशल मिडीया खूप व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओमध्ये ती तिच्या कथित बॅायफ्रेंड आणि तिची लहान बहीण आणि अभिनेत्री नुपूर सेननसोबत दिसत आहे.

क्रिती सेनन हिने २०१४ मध्ये तेलगू फिल्म ‘नेनोक्कडाइन’ मधून अभिनयात पदार्पण केलं होत. यात ती अभिनेता महेश बाबू दिसली होती. त्यानंतर तिने ‘हिरोपंती’ या सिनेमातून बॅालीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने अनेक हिट सिनेमे बाॅलीवूडला दिले. ती चर्चेत आली आहे याच कारण क्रितीचा धूम्रपान करतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे.

क्रिती सेनन तिचा कथिक बॅायफ्रेंड कबीर बहिया आणि तिची बहिण नुपूर सेननसोबत धूम्रपान करताना तिचा हा विडिओ वायरल होत आहे. याच्यावर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. यातच तिची आई गीता सेनन यांची एक जूनी पोस्ट वायरल होत आहे.त्यात तिच्या आईने स्पष्ट सांगितलं आहे की तिची मुलगी धूम्रपान करत नाही.

२०१७ मध्ये तिने फिल्म ‘बरेली की बर्फी’ च्या वेळेस शुटींग दरम्यान तिचा एक फोटो खूप वायरल होत होता त्यात ती धृम्रपान करताना दिसली होती. याचदरम्यान एका फॅन पेजने स्पष्ट सांगितल होत कि ती तिच्या फिल्मच्या रोलसाठी धूम्रपान करते आहे. ती तिच्या खऱ्या आयूष्यात धृम्रपान करत नाही.याच फॅन पेज पोस्टला कृतीची आई प्रतिक्रिया देत म्हणाली, “कृती धूम्रपानाच्या विरोधात आहे आणि ती तिच्या आजूबाजूच्या लोकांना ते सोडण्याचा सल्ला देते.

अभिनेत्री कृतीचा हा विडिओ समोर आल्यावर लोक या पोस्टला प्रतिक्रिया देत आहेत.कृतीने तिचा कथिक बॅायफ्रेंड आणि बहीण नुपूर सेनन सोबत आपला वाढदिवस साजरा केला. अजूनही क्रिती आणि तिच्या बॅायफ्रेंडने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘दाढी ठेवून, बाळी घालून कोणी शिवाजी महाराज होत नाही’ संतोष जुवेकरचे जातीधर्मावर वक्तव्य
निक्की तांबोळीने काढली वर्षा उसगावकरांची अक्कल, त्या एका चुकीमुळे घडलं महाभारत

हे देखील वाचा