केआरकेने मिका सिंगविरुद्ध गाणे केले होते रिलीझ; यूट्यूबने केले बॅन, तर म्हणाला, ‘मला त्रास देण्यासाठी…’


स्वयंघोषित चित्रपट समीक्षक केआरके मागच्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. सलमान खानवर अनेक आरोप लावल्यानंतर केआरकेने आता त्याचा मोर्चा मिका सिंगकडे वळवला आहे. मिका आणि केआरके वाद मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

मिकाने केआरकेवर एक गाणे तयार केले होते. आता केआरकेने मिकावर गाणे तयार केले आणि ते त्याच्या यूट्यूब चॅनेलर अपलोड केले. केआरकेच्या या गाण्यावर कारवाई करत यूट्यूबने हे गाणे काढून टाकत केआरकेच्या यूट्यूब चॅनलला एक आठवड्यासाठी ब्लॉक केले. मात्र, पुढील काही तासातच केआरकेचे चॅनेल आणि गाणे पुन्हा सुरु करण्यात आले.

केआरकेने त्याच्या या नवीन गाण्याची लिंक ट्वीट करत लिहिले, “माझ्या मुला मिका सिंग हे आहे ब्लॉकबस्टर सुवर सिंगर गाणे. मी सोशल मीडियाचा निर्वीवाद राजा आहे. म्हणून तुझ्या वडिलांना शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस.”

मागच्या मोठ्या काळापासून मिका आणि केआरके आपापसात भांडताना दिसत आहेत. मिकाने केआरकेवर केलेल्या ‘कुत्ता’ गाण्यानंतर केआरकेने देखील सोमवारी मिकावर सुवर गाणे करत ते यूट्यूबवर अपलोड केले. पण हे गाणे अपलोड केल्यानंतर केआरकेचे यूट्यूब अकाऊंट एक आठवड्यासाठी बॅन करण्यात आले.

यूट्यूबच्या या पावलामुळे केआरकेने चिडून ट्वीट करत लिहिले, “तुम्ही वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम लावतात. याचे माझ्याकडे पक्के पुरावे आहेत. अनेक लोकांनी विविध व्हिडिओमध्ये माझ्या फोटो आणि व्हिडिओंचा वापर केला. मात्र, तुम्ही माझी तक्रार कधीच घेतली नाही. अप्रत्यक्षरीत्या तुम्ही त्या लोकांना मला त्रास देण्यासाठी मदतच करत आहात.”

यासोबतच त्याने यूट्यूबकडून त्याला मिळालेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट देखील जोडला आहे. ज्यात लिहिले आहे की, केआरके पुढचे आठ दिवस त्याच्या यूट्यूब चॅनेलवर काहीही अपलोड करू शकणार नाही.

केआरकेने सलमानच्या ‘राधे’ सिनेमावर निगेटिव्ह कमेंट करत त्याच्यावर आणि त्याच्या ‘बिंग ह्युमन’ या NGO वर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते, सलमानच्या टीमने मिकावर मानहानीचा गुन्हाही दाखल केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’

-रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी पन्नू; सोशल मीडियावर रंगलीये चांगलीच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.