Womens Day Special: महिलांना जगण्यासाठी प्रेरणा देणारे ५ सिनेमे, दीपिकाच्या ‘या’ चित्रपटाचाही समावेश

Let's celebrate international women's day with some female oriented films


हिंदी चित्रपटसृष्टीत बराच बदल झालेला दिसून येतो. एक काळ असा होता जेव्हा पुरुषांना केंद्रस्थानी ठेवून अनेक चित्रपट बनत असे. पुरुषांच्या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडल्या जात असे. पण जसजसा काळ बदलला आजूबाजूची परिस्थिती बदलली, तेव्हापासून महिलांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेले चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडू लागले. चित्रपटसृष्टीने देखील मागील काही काळात महिलांवर आधारित अत्यंत उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत. दर वर्षी 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निम्मिताने आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे प्रत्येक मुलीने पाहिले पाहिजेत. या चित्रपटांच्या कथेवर मुलींचा आजचा वर्तमान आणि भविष्यातील साहसी कृत्य अवलंबून असणार आहेत.

१. पिकू

एका बाप लेकीच्या जीवनावर आधारित खूपच कमी चित्रपट बनले आहेत. या नात्यावर आधारित ‘शुजीत सरकार’ यांनी सन २०१५ मध्ये ‘पिकू’ नावाचा एक जबरदस्त सिनेमा बनवला आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे.

२. थप्पड

सन 2020 मध्ये ‘तापसी पन्नू’चा ‘थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘अनुभव सिन्हा’ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची कहाणी घरातील वादावर आधारित आहे. महिलांवर होणारे अन्याय त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक यांना वाचा भोडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात तापसीसोबत दिया मिर्झा, ग्रिसी गोस्वामी, अंकुर राठी, मानव कौल, राम कपूर यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.

३. इंग्लिश विंग्लिश

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री ‘श्रीदेवी’ चा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा एका अशा महिलेची कहाणी आहे, जी तिचे संपूर्ण आयुष्य तिचा पती आणि मुलांसाठी समर्पित करते. पण या बदल्यात तिला जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मिळत नव्हता. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला ‘गौरी शिंदे’ यांनी दिग्दर्शित केले होते.

४. क्वीन

अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘क्वीन’ या चित्रपटाने देखील सगळ्या प्रेक्षकाचे मन जिंकले होते. एका मॉर्डन जमान्यातील एका साध्या मुलीची कहाणी या चित्रपटमधून मांडली आहे. जी तिच्या आई वडिलांच्या मर्जीने लग्न करणे, आणि पतीच्या मर्जी विरोधात कोणताच निर्णय न घेणे हा आपला धर्म मानते. या चित्रपटात ‘राजकुमार राव’ देखील आहे.

५. अज्जी

सन 2017 मध्ये ‘अज्जी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला देवाशीष मखिजा यांनी दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटात बलात्कार आणि या बद्दलची भावना याबाबत दाखवले आहे. या चित्रपटात सुषमा देशपांडे, शेरवानी सुर्यवंशी, अभिषेक बनर्गी, विकास कुमार, मनुज शर्मा, किरण खोज आणि स्मिता तांबे हे मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

मनोरंजन व्हाया वेबसिरीज! हॉलिवूडमधील ‘या’ प्रमुख १० वेबसीरिज ठरतायेत प्रचंड लोकप्रिय, विकेंडमध्ये पाहायला नका विसरू

-मिथुन चक्रवर्तीच नव्हे तर ‘या’ सेलिब्रिटींनीही गाजवलंय राजकारणाचं मैदान! अमिताभ, हेमा, धर्मेंद्र यांचाही समावेश

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा


Leave A Reply

Your email address will not be published.