‘लायगर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी विजय देवरकोंडाच्या चाहत्यांना केले निराश! सोशल मीडियावर निवेदन जारी करत म्हणाले…

liger makers postpones vijay deverakonda and ananya panday film teaser due to covid 19 read latest south movie news and gossips


टॉलिवूड सुपरस्टार विजय देवरकोंडा रविवारी (९ मे) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी चाहते उत्सुकतेने अभिनेत्याच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटाच्या पोस्टर किंवा टिझरची वाट पाहत होते. या चित्रपटाचा टिझर व्हिडिओही आज रिलीझ होणार होता. परंतु चित्रपट निर्मात्यांनी हे सध्यासाठी पुढे ढकलले आहे. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे अभिनित ‘लायगर’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत जाहीर केले होते की, ते या चित्रपटाचा टिझर व्हिडिओ आज रिलीझ करणार आहेत. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला तोंड देत असणाऱ्या आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी या योजनेला ब्रेक लावला आहे. आता जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हाच चित्रपटाचा टिझर रिलीझ करण्यात येणार आहे.

चित्रपटाच्या सह-निर्माता चार्मी कौर यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “या कठीण परिस्थितीत, आपण सर्वजण घरी असाल आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत असाल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही ९ मे रोजी लायगर चित्रपटाचा धमाकेदार टिझर व्हिडिओ रिलीझ करण्यास तयार होतो. परंतु देश आज ज्या परिस्थितीला सामोरे जात आहे, हे लक्षात घेता आम्ही हे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा देश चांगल्या स्थितीत असेल, तेव्हा टिझर तुमच्यासोबत शेअर केला जाईल. असे असूनही, आम्ही आपल्याला हमी देतो की, या टिझरमध्ये आपण विजय देवरकोंडाला अद्याप या लुकमध्ये पाहिले नसेल. तुम्ही अजिबात निराश होणार नाहीत.”

निवेदनात पुढे असे लिहिले आहे की, “आरामात राहा, तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो की, तुम्ही तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. लसीकरणासाठी शक्य तितक्या लवकर एकमेकांना मदत करा. सर्व सूचनांचे पालन करा. आम्ही आपल्याला खात्री देतो की, या परिस्थितीत आपण सर्व एकत्र आहोत. थिएटरमध्ये लवकरच भेटू, जेव्हा निरोगी आणि बळकट म्हणून आपला देश पुन्हा उभा राहिल.”

हा चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाथ बनवत आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स आणि चार्मी पुरी व पुरी जगन्नाथ यांच्या पुरी कनेक्टच्या बॅनरखाली, या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रपटात विजय देवरकोंडा जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.