Thursday, April 25, 2024

प्रख्यात डॉनला ‘तिच्याशी’ लग्न करायचं होतं, तर ‘तिला’ वाचवायला किशोर कुमारांनी पाण्यासारखा पैसा केला होता खर्च

आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांच्या दिलाची धडकन झालेली दिवंगत अभिनेत्री मधुबाला हीचे रूप आजदेखील विसरता न येणारे आहे. एक दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीपुढे भल्या भल्या लोकांनी आपले गुडघे टेकले होते. कारण तिचे रूपच असे होते की, सहज कोणीही तिच्या प्रेमात पडेल.

तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर जे राज्य केले होते ते आजही कायम आहे. तिचे सौंदर्य, लाजणे, खळखळून हसणे, डोळ्यातून इशारा करणे ह्या सर्व गोष्टी मनाला सुखवणाऱ्या होत्या. दिलीपकुमार पासून ते किशोरकुमारपर्यंत सगळेच तिच्यावर फिदा होते. परंतू २३ फेब्रुवारी १९६९ ला हृदयविकारामुळे वयाच्या ३६व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.

मधुबालाच्या बऱ्याच प्रेमप्रकराणाच्या चर्चा आपण ऐकल्या असतील,परंतु अंडरवर्ल्ड डॉन हा देखील मधुबालाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. ही माहिती फार कमी जणांना माहिती असेल. हाजी मस्तान याला मधुबाला खूपच आवडायची आणि तो तिच्यावर फिदा होता. मधुबालाचा सौंदर्यावर तो इतका भाळला होता की तो तिच्यासोबत लग्न करू इच्छित होता. मात्र परिस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. ज्यावेळी आपले प्रेम तिच्याकडे तो व्यक्त करणार होता, त्यावेळी मधुबालाने जगाचा निरोप घेतला होता.

मधुबालाचा मृत्यूनंतर हाजी मस्ताने तिची डुप्लिकेट आणि स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस सोनासोबत लग्न केले. सोनाची जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली, तेव्हा लोकांना एका क्षणी वाटलं की मधुबाला परत आली आहे. मधुबालासारख्या दिसणाऱ्या सोनामुळे कित्येक जण पेचात सापडले होते. त्याने तिच्यावर खूप पैसे खर्च केले होते, परंतु तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत. तिचे सगळे चित्रपट फ्लॉप गेले. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राज कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान यांसारखे दिग्गज बॉलीवूड अभिनेते हाजी मस्तानचे मित्र असल्याच्या तेव्हा बातम्या येत असे.

सोनासोबत लग्नाच्या अगोदर हाजी हा विवाहित होता पण त्याचा कोणताच परिणाम दोघांच्या नात्यावर त्याने होऊ दिला नाही. मस्तानने सोनाला पहिल्यांदाच आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या फिल्ममध्ये काम करताना पाहिले आणि त्याच वेळी त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

मधुबाला हृदयाचा त्रास होता, अनेकदा चित्रपट सेटवर तिची प्रकृती बिघडायची. उपचारासाठी ती लंडनला देखील गेली होती परंतु तीची शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. शस्त्रक्रिया करताना तिचा कधीही मृत्यू होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांना वाटत होते. तिच्या हृदयात छिद्र होते आणि तिला फुफ्फुसाचा त्रास देखील होता. तिला एक गंभीर आजार होता, ज्यामध्ये तिच्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त रक्त तयार होण्यास सुरवात झाली होती आणि हे रक्त नाक आणि तोंडातून बाहेर येत असे. किशोर कुमार यांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. सलग नऊ वर्षे अंथरुणावर उपचार घेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

अमेरिकेचा थिएटर आर्ट्स या मासिकाने तिचा ‘जगातील सर्वात मोठी अभिनेत्री’ म्हणून तिचा गौरव केला होता. बसंत या चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करणारी मधुबाला हीचा तिच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर ‘जलवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण भारत हळहळला होता. आजवर इतक्या वर्षानंतर देखील तिच्या चाहत्यांच्या संख्येत थोडीही कमी झाली नाही आहे.

 

हे देखील वाचा