‘माझा होशील ना’ फेम सई अन् आदित्यचा मेणबत्तीसोबत चाललाय टाइमपास; सेटवरील मस्ती होतेय तूफान व्हायरल


‘माझा होशील ना’ या मालिकेने टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेंच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती. यातील सई आणि आदित्यची प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अर्थातच गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. यातील कलाकारांनी देखील अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. मालिकेच्या सेटवर सतत मस्ती मजा केली जाते. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता या मालिकेच्या सेटवरील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चा रंगवत आहे.

हा व्हिडिओ अभिनेता विराजस कुलकर्णीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त गौतमी देशपांडे आणि सेटवरील इतर काही सदस्य दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, हातात मेणबत्ती घेऊन सर्वांची मस्ती चालली आहे. ते सगळे हातात मेणबत्तीचे संतुलन साधत हात गोल फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर ‘राम लीला’ चित्रपटातील ‘अंग लगा दे’ गाण्यात ज्याप्रकारे दीपिका पादुकोण हा स्टंट करत आहेत, याचीच हुबेहूब नक्कल ही मंडळी या ठिकाणी करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत विराजसने लिहिले आहे की, “गोलियों की रास रिसॉर्ट. वेळ घालवण्यासाठी आम्ही काहीही करतो.” या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘अंग लगा दे’ हे गाणंही वाजत आहे. सेटवरील कलाकारांची मस्ती नेहमीच नेटकऱ्यांना आवडते. त्याचप्रमाणे आता या व्हिडिओलाही चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

विराजस कुलकर्णीबद्दल बोलायचे झाले, तर तो प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. अभिनेत्याशिवाय तो एक लेखक आणि दिग्दर्शकही आहेत. त्याने बऱ्याच शॉर्ट फिल्म्सच्या कथा लिहिल्या आहेत. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातून, रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर तो स्वप्ना जोशी दिग्दर्शित ‘माधुरी’ व पुढे ‘ती अँड ती’ चित्रपटात झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.