अशी मेहनत घेतली तर तुम्हीही दिसाल मलायकासारखे फिट, जाणून घ्या तिचा डायट आणि व्यायामाचे रुटीन

malaika arora diet and workout plan here secret flat belly and toned body


बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा जिथेही जाते, तिथे तिचे आकर्षक फिगर आणि सौंदर्य सर्वांनाच चकित करून सोडते. मलायकाच्या आकर्षक फिगरमागे तिची खूप मेहनत आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी तिची फिटनेस अगदी कौतुकास्पद आहे. जे लोक विशेषत: वजन कमी करण्यासाठी संघर्ष करत आहेत किंवा तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी मलायकाची फिटनेस रूटीन खूप फायदेशीर ठरू शकते.

मलायका अरोराचा डायट प्लॅन-
असे म्हटले जाते की, मलायका डायटिंगवर विश्वास ठेवत नाही. त्याऐवजी, ती काही ना काही खात राहणे पसंत करते, परंतु तेही निरोगी. विशेष म्हणजे, बाहेर खाण्याऐवजी तिला घरात बनवलेले जेवण आवडते. याशिवाय मलायका असे पदार्थ खाणे टाळते, ज्यामध्ये कॅलरीज अधिक असतात. तिला नट्स आणि फळांचा नाश्ता करायला आवडतो. ती दररोज तिच्या आहारात नारळपाणी, फळे किंवा भाजीपाल्याचा रस यांचा समावेश करायला अजिबात विसरत नाही.

मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात गरम पाण्यात लिंबू आणि मध घेऊन करते. यानंतर ती इडली, उपमा किंवा पोह्यासह ताज्या फळांचा रस घेते. कधीकधी अंड्याच्या पांढर्‍या भागासह, मल्टीग्रेन टोस्ट खायला देखील तिला आवडते. न्याहारीमध्ये मलायकाला १ ग्लास ताज्या भाजीपाल्याचा रस, २ ब्राऊन ब्रेड टोस्ट आणि अंड्याचा पांढरा भाग खाणे आवडते. दुपारच्या जेवणामध्ये ती प्रामुख्याने कोशिंबीर, ब्राऊन राईस किंवा चपातीसह चिकन अन्यथा माश्यांचा समावेश करते.

व्यायाम केल्यानंतर मलायका केळी खाते आणि प्रोटिन शेक पिते. रात्रीचे जेवण ती लवकर बनवते, ज्यामध्ये उकडलेल्या भाज्या आणि कोशिंबीरीसह एक वाटी सूप घेते.

मलायका अरोराचे व्यायाम सत्र-
मलायका अरोराचे सोशल मीडिया अकाऊंट तिच्या फिटनेस व्हिडिओंनी भरलेले आहे. आपले स्लिम-ट्रिम आणि टोन फिगर टिकवण्यासाठी, ती वर्कआउटमध्ये कार्डियो, वजन प्रशिक्षण, योग आणि पिलेट्ससह विविध व्यायाम करते. ती दररोज २० मिनिटांच्या कार्डिओ सत्राने व्यायामाची सुरूवात करते. याशिवाय मलायका आठवड्यातून किमान तीन दिवस, अर्धा तास चालत असते. तिला योगा करणे खूप आवडते. ती तिच्या चमकदार त्वचेसाठी योगाला प्राधान्य देते. पोहणे आणि डान्स देखील तिला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करते.


Leave A Reply

Your email address will not be published.