वयाच्या ४७ व्या वर्षी पाहायला मिळाला मलायकाचा बोल्ड अंदाज; चाहत्याकडून मिळाली ‘ही’ खास भेट


चित्रपटसृष्टीमध्ये वावरताना सर्वच कलाकरांना त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घ्यावी लागते. मग अभिनेत्री असो किंवा अभिनेता या क्षेत्रात टिकण्यासाठी योग्य फिटनेस खूप महत्वाचा आहे. या क्षेत्रात अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी त्यांचा फिटनेस कमालीचा जपला आहे. यात अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. अशीच एक फिट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायकाने तिच्या फिटनेसने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. वयाची चाळीशी ओलांडलेली मलायका आजही पंचविशीतल्या तरुणीसारखी दिसते.

मलायकाच्या फिटनेसचा आज अनेक हेवा वाटत असतो. ती तिच्या फिटनेससोबतच तिच्या जबरदस्त स्टाईलसाठी देखील तितकीच प्रसिद्ध आहे. कोणतीही वेशभूषा मलायका अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते. मलायकाने नुकतेच तिचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत असून, तिचा हा अंदाज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच गाजताना दिसत आहे.

हा व्हिडिओ तिने तिच्या फोटोशूटचे अनेक व्हिडिओ एकत्र करून तयार केला आहे. यात ती समुद्र किनारी, पाण्यात, पाण्याबाहेर, एक से बढकर एक ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने घातलेले आऊटफिट देखील खूपच बोल्ड आणि मादक आहे. या ड्रेसमध्ये ती देत असलेल्या स्टनिंग पोज नेटकऱ्यांना घायाळ करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना मलायकाने लिहिले, “वीकेंड फील्स…लव द एडिट.” विशेष म्हणजे हा व्हिडिओ मलायकाच्या एका फॅनने तयार केला असून, तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मलायका थाई स्लिट ड्रेस, बिकिनी, ब्लॅक मिडी, रेड, सिल्वर रिव्हिलिंग ड्रेसमध्ये हॉट पोझ सेट आहे. मलायकाच्या या व्हिडिओवर फॅन्सने फायर, हृदय असणारे इमोजी तसेच हॉटी, सेक्सी, अमेझिंग, डॅशिंग, सुंदर ब्युटीफुल आदी लिहित तिचे कौतुक केले आहे. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असून, ती अनेकदा आपले फोटो पोस्ट करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदर अन् सुशील!’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’


Leave A Reply

Your email address will not be published.