लईच वाईट झालं! दिग्दर्शक सिवन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

Malayalam Cinematographer And Director Sivan Died


मागील वर्षीप्रमाणेच हे वर्षदेखील चित्रपटसृष्टीसाठी वाईट आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण यादरम्यान अनेक दिग्गज कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक सिवन यांचे गुरुवारी (२४ जून) राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. सिवन यांच्या निधनावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही शोक व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त अनेक कलाकारही त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे चित्रपट निर्माते संगीत सिवन, संतोष सिवन आणि संजीव सिवन ही त्यांची मुलं आहेत.

मुलगा संगीतचे केले भावुक ट्वीट
संगीतने सोशल मीडियावर ट्वीट करत वडील सिवन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. संगीतने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद बाबा. तुमच्याविना जगाचा विचार करणे खूपच कठीण आहे. परंतु तुम्ही जी वाट दाखवली आहे, त्यावर आम्ही चालत राहू. आम्ही सदैव तुमचे आभारी राहणार आहोत.”

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत सिवन
माध्यमातील वृत्तानुसार, सिवन केरळचे पहिले वृत्त छायाचित्रकार होते. याव्यतिरिक्त सन १९९१ मध्ये आलेल्या ‘अभयम’  या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते, ज्याला सर्वोत्तम बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.