सिद्धूचे लाल रंगाच्या कुर्तामधील फोटो झाले व्हायरल, दिसतोय एकदम हँडसम

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेते आहेत. ज्यांच्याकडे आज नेम आणि फेम या दोन्ही गोष्टी आहेत. काहींना या जन्मताच वंश परंपरेने मिळाल्या आहेत, तर काहींनी त्या स्वतःच्या बळावर कमावल्या आहेत. असंच अभिनयाचा कोणताही वारसा नसलेला एक अभिनेता या चंदेरी दुनियेत उतरला. पाहायला गेलं तर हा प्रवास त्याच्यासाठी काही सोप्पा नव्हता. पण अनेक अडचणींना सामोरे जाऊन, संकटाशी दोन हात करून तो अभिनेता आज यशाच्या त्या शिखरावर पोहचला आहे. जिथे आज त्याला लहानांपासून ते वृद्धांपर्यत सगळे ओळखतात. हा अभिनेता म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. आपल्या विनोदी स्वभावाने त्याने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. सिद्धू टीव्हीवर दिसला म्हणजे आजचा दिवस हसून-हसून लोटपोट होणार, हे सर्वांना माहित असते. सिद्धू हा आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो शेअर करत असतो. अशातच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सिद्धार्थने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सिद्धार्थचा लूक खूप वेगळा दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिद्धार्थने लाल रंगाचा कुर्ता घातलेला आहे. त्याने त्याच्या केसांना देखील एक वेगळा आणि स्टायलिश लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच डोळ्यांवर चष्मा देखील लावलेला आहे. या फोटोमध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. तसेच लाल रंग देखील त्याला शोभून दिसत आहे.

https://www.facebook.com/100044357049699/posts/388933652595200/

सिद्धार्थने शेअर केलेले हे फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. काहींना त्याचा ड्रेसअप खूप आवडला आहे, तर काहींना त्याची हेअर स्टाईल खूप आवडत आहे. अशाप्रकारे त्याच्या या फोटोला सातत्याने लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (marathi actor siddharth jadhav share her photos on social media)

सिद्धार्थ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘दे धक्का’, टाइम प्लिज, ‘खो खो’, ‘प्रियतमा’, ‘येरे येरे पैसा’, ‘ढोलकी’, ‘शिकारी’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फक्त लढा म्हणा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यासोबत त्याने हिंदीमध्ये ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’, ‘सिंबा’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

Latest Post