मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तुझ्यात जीव रंगला‘ ही मालिका संपली असूनही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे. त्याशिवाय त्यामधील चाहत्यांची प्रिय जोडी राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असून खऱ्या आयुष्यातही जोडी एकत्र आल्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं फेवरेट कपल बनलं आहे. हे जोडपं लग्न बंधनात अडकल्यापासून सतत कोणत्या कोणत्या कारणासाठी चर्चेत असतं. नुकतंच अक्षयाने तिच्या इंस्टा स्टोरीला एक फोट शेअर केला आहे, ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अक्षया देवधर (Akshaya Deodhar) अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. लग्न झाल्यापासून ती सतत आपल्या वैयक्तीक आयुष्याचेही आनंदाचे क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने मुंबई ट्रॅफिकबद्दल एक फोटो आपल्या अधिकृत इंस्टग्राम स्टोरीला शेअर केला आहे. त्याशिवाय अक्षयाच्या कॅप्शनने चाहात्यांचे लक्ष वेधले आहे. (akshaya deodhar share mumbai tarfic photo on instagarm story)
अक्षयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसत असून तिच्या हातामध्ये शेंगदाण्याची पुडी दिसत आहे. अक्षयाने या फोटोमधून मुंबईच्या वाहतुक कोंडीवर भाष्य केलं आहे, त्याशिवाय तिने फोटोला कॅप्शन देत लिहिले की, “मुंबईच्या ट्राफिकमध्ये शेंगदाणे विकू लागलेत आता…आनंदी व्हायचं की दु:खी?”

अक्षायाच्या या इंस्टा स्टोरीवर लाखो चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. अक्षया देवधर व हार्दिक जोशीने 2 डिसेंबरला लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. राणादा-पाठकबाई ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध झाल्याने चाहतेही आनंदी आहेत. (Akshaya Deodhar shared a photo of Mumbai traffic and said, do you want to be happy or sad?)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुशांत सिंगच्या वाढदिवसाच्या दिवशी बहिणींनी दिला भावाच्या आठवणींना उजाळा, शेअर केले व्हिडिओ आणि फोटो
राखी सावंतने शर्लिन चोप्राला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘काही लोक मला…’