‘मुक्मल है दुनिया तेरे मुस्कान पर’, म्हणत चाहत्यांनी केले ऋता दुर्गुळेच्या सुंदर फोटोचे कौतुक

झी युवा या वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते. या मालिकेने विशेषतः तरुण वर्गाला भुरळ घातली होती. यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला देखील खूप लोकप्रियता मिळाली. तिचे निखळ सौंदर्य, गोड हसू यासोबत गालावर पडणारी छोटीशी खळी यावर अवघा तरुणवर्ग भुलला होता. तसेच मालिकेत वैदेही आणि मानसीची जोडी आणि त्यांची प्रेम कहाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर तिला खूप लोकप्रियता मिळाला होती. ऋता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच ऋताचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.

ऋताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली असून, काळ्या रंगाचाच स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. यावर तिने कानात मोठे ईअरिंग घातले आहेत. तर कपाळावर काळ्या रंगाची टिकली लावून सगळे केस मागे बांधले. या लूकमध्ये ती साधी पण तितकीच आकर्षित दिसत आहे. (Marathi actress hruta durgule share her beautiful photo on social media)

तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट करून लिहिले आहे की, “सौ लफ्ज लिख दू तेरे एक दीदार पर, मुक्मल है दुनिया तेरे एक मुस्कान पर.” तर आणखी एका चाहत्याने “फुलपाखरू” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर अनेक चाहते हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

ऋता ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांमध्ये फॉलोवर्स आहेत. तिने या आधी ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले आहे. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट