‘सांग तू आहेस का’ फेम शिवानी रांगोळेच्या ‘या’ लेटेस्ट फोटोने चोरली चाहत्यांची मनं! एक नजर टाकाच

marathi actress shivani rangole shared her latest photo on social media see here


अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या ‘सांग तू आहेस का’ हा मालिकेद्वारे रोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सतत आपले नवनवीन फोटो शेअर करून ती चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत असते. तिचे चाहतेही तिच्या फोटोला खूप प्रेम देत असतात. नुकताच तिने शेअर केलेला एक फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

शिवानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि आणि निळी जीन्स परिधान केली आहे. सोबतच शॉर्ट हेअरमुळे ती यात अधिकच सुंदर दिसत आहे. अगदी साध्या लूकमध्येही शिवानी इतकी सुंदर दिसतेय, हे पाहून चाहतेही हैराणच आहेत. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “पीस” अर्थातच शांतता असं लिहिलं आहे.

अलीकडेच तिने शेअर केलेले फोटो देखील चाहत्यांना खूप आवडले होते. या फोटोंमध्ये शिवानी एका नाईट ड्रेसमध्ये दिसली होती. यात देखील तिची सुंदरता पाहण्यासारखी होती. या ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोत शिवानी बऱ्यापैकी गोंडस दिसत होती.

शिवानीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेद्वारे टीव्ही जगात पाऊल ठेवले होते. पुढे तिने ‘बन मस्का’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत काम केले आहे. याशिवाय ती ‘ऍंड जरा हटके’, ‘फुंतरू’, ‘डबल सीट’, ‘चिंटू २’ या चित्रपटात झळकली आहे. विशेष म्हणजे शिवानीने बऱ्याच नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.