‘आती हुई लहरो पे जाती हुई लडकी!’, म्हणत समुद्रांच्या लाटांसोबत खेळताना दिसली मराठमोळी सुखदा खांडकेकर

actress sukhada khandekar playing with ocean waves video goes viral on internet


मराठी सिनेसृष्टीत आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे सुखदा खांडकेकर. तिचे फोटोशूट्स बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सदैव पारंपारिक अंदाजातील फोटो शेअर करून ती चाहत्यांचे हृदय चोरते. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने तिने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. नुकतीच अभिनेत्रीने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

हा एक व्हिडिओ आहे, जो सुखदाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती समुद्राच्या किनारी, लाटांशी खेळताना दिसत आहे. सोबतच ती ‘छई छप्पा छई’ या गाण्यावर थिरकतही आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, सुखदा किती मनसोक्तपणाने आपल्या जगण्याचा आनंद घेत आहे. तसेच तिच्या मागचे सूर्यास्ताचे वातावरण अगदी बघण्यासारखे आहे.

हा व्हिडिओ शेअर करत, सुखदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “…आती हुई लहरो पे जाती हुई लडकी.” सूर्यास्ताच्या वेळी शूट केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सुखदा ही प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकरची पत्नी आहे. बऱ्याचदा हे जोडपे त्यांचे कपल फोटोशूट शेअर करत असते. सुखदाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘आभास हा’, ‘घरकुल’ यासारख्या मालिकेमध्ये दिसली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’मध्ये तिने मल्हाररावांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय सुखदा ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.