फादर्स डे २०२१: मराठमोळ्या कलाकार मंडळींनी खास दिनानिमित्त शेअर केल्या वडिलांसोबतच्या खास आठवणी


आज २० जून, अर्थातच जागतिक पितृदिन. या दिनानिमित्त सर्वत्र आपल्या वडिलांवर भरभरून प्रेम व्यक्त केलं जात आहे. अगदी सामान्य व्यक्तीपासून ते मोठमोठ्या कलाकार मंडळींपर्यंत हा दिवस प्रेमाने साजरा केला जात आहे. याची झलक आपल्याला सोशल मीडियावर सहज दिसेल. या खास निमित्ताने बऱ्याच मराठमोळ्या कलाकारांनी आपापल्या वडिलांना खास पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी आपल्या मुलामुलींचा फोटो शेअर करून स्वतः ला शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात कोण कोण आहेत या यादीत सामील.

रसिका सुनील-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया अर्थातच रसिकाने तिच्या वडिलांसोबतचा व्हिडिओ शेअर करत पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्यांचे अनेक फोटो मिळून बनवला आहे.

मानसी नाईक-
अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या लग्नसोहळ्यातले वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून मानसी म्हणतेय की, “सपने तो मेरे थे पर उनको पूरा करने का रास्ता, कोई और दिखाए जा रहा था और वो थे मेरे.”

गश्मीर महाजनी-
अभिनेता गश्मीर महाजनीने त्याच्या मुलासोबतचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत सुंदर असं कॅप्शन लिहित त्याने हा दिवस खास बनवला आहे.

सायली संजीव-
‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवनेही वेगवेगळ्या फोटोंचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने वडिलांसोबत घालवलेले बरेचसे क्षण कैद झालेले दिसत आहेत.

आदिनाथ कोठारे-
आदिनाथ कोठारेने त्याच्या मुलीसोबतचा एक गोड व्हिडिओ शेअर करून पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याची मुलगी त्याला ‘आय लव्ह यू’ म्हणताना दिसत आहे.

पुष्कर जोग-
पुष्कर जोग याने देखील मुलीसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून स्वतःला आणि इतर वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वप्नील जोशी-
सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी याने त्याच्या मुलांसोबत आणि वडिलांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मुलं म्हणजे घरातला गोड पसारा…! माझे बाबा, मायरा आणि राघव यांच्यासोबत जगणारा मी श्रीमंत माणूस आहे…!”

चिन्मय मांडलेकर-
अभिनेता चिन्मय मांडलेकर वडिलांसोबतचा त्याचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच त्याने ‘बाबा’ असं कॅप्शन लिहिलं आहे.

अमेय वाघ-
अभिनेता अमेय वाघने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. त्याने लिहिलंय की, “कितीही प्रयत्न केला तरी “ए बाबा” आणि “I love you रे बाबू” वगैरे म्हणता येत नाही ! कायम “अहो बाबा” आणि आदरयुक्त प्रेम तर आहेच!”

मिताली मयेकर-
अभिनेत्री मिताली मयेकरने देखील लग्नसोहळा व हळदी समारंभातले वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सहज लक्षात येईल, की मिताली तिच्या वडिलांच्या किती जवळ आहे.

श्रेयस तळपदे-

 

अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या मुलीसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या चिमुकलीने त्याला या खास दिनी स्वतः बनविलेलं भेटकार्डही दिलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटसृष्टीतील सिंगल ‘बापमाणसं’, जे त्यांच्या मुलांना एकटेच देतायत आई- वडिलांचे प्रेम

-वडिलांच्या प्रेम आणि त्यागावर आधारित हिंदी चित्रपट, ज्यांनी दिली अनोखी ओळख; ‘फादर्स डे’निमित्त घ्या जाणून

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.