Friday, March 29, 2024

लईच देखणी आहे मिथुन चक्रवर्ती यांची लेक; कचरा कुंडीतून उचलत अभिनेत्यानं घेतलं होतं दत्तक

आजच्या सोशल मीडियाच्या जगाने स्टार्स इतकेच किंबहुना स्टार्सपेक्षा अधिक त्यांच्या मुलांना ग्लॅमर प्राप्त करून दिले आहे. मग ते मुलं अगदी एक दिवसाचे असो, एक महिन्याचे असो किंवा वीस वर्षाचे. या मुलांना सोशल मीडियामुळे चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच तुफान लोकप्रियता मिळते. स्टार्स किड्स हा माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर अनेकदा रंगणारा विषय आहे. या स्टार्स किड्सला सोशल मीडियावर त्यांच्या आई- वडिलांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. अभिनयात किंवा इतर करिअरच्या आधीपासूनच किड्सला मिळणारे ग्लॅमर वाखाणण्याजोगे आहे. या स्टार्स किड्सची यादी भरपूर मोठी आहे. अगदी तैमूरपासून ते आताच्या आलिया कश्यपपर्यंत अनेक कलाकार हे स्टार्स किड्स म्हणून ओळखले जातात.

या स्टार किड्सच्या जगात एक नाव प्रकर्षाने पुढे येत आहे, आणि ते नाव म्हणजे दिशानी चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्ती यांची लेक असलेली दिशानी देखील तिच्या सोबतच्या सर्व किड्सला जोरदार टक्कर देत आहे. सध्या दिशानी चित्रपटांपासून दूर असली, तरीही तिच्या नावाच्या आणि सौंदर्याच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात. दिशानी देखील इतर किड्सप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर दिशानीचे तब्बल ८० हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. दिशानी दबंग सलमान खानची सर्वात मोठी फॅन असून ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.

दिशानीला तिच्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे आहे. तिने तिचे शालेय शिक्षण तमिळनाडूच्या मोनार्क इंटरनॅशनल स्कूलमधून घेतले असून, सध्या ती न्यूयॉर्कमध्ये फिल्म अकॅडमीमधून अभिनयाची पदवी संपादन करत आहे. दिशानी नेहमी या अकॅडमीमधील तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.

दिशानीबद्दल सांगायचे झाले, तर ती मिथुन यांची खरी मुलगी नसून त्यांनी तिला दत्तक घेतले आहे. दिशानीच्या खऱ्या आई- वडिलांनी तिला कचरा कुंडीत फेकून दिले होते. एका एनजीओने तिला वाचवले जेव्हा ही गोष्ट मिथुन यांना समजली, तेव्हा त्यांनी आणि योगिता बालीने तिला दत्तक घेतले. महाक्षय चक्रवर्ती, नमाशी चक्रवर्ती आणि उशमेय चक्रवर्ती या तिघे भावांमध्ये दिशानी एकटी बहीण असून ती घरात सर्वांची लाडकी आहे.

दिशानी जरी अजून अभिनयात आली नसली, तरीही ती अनेक शॉर्ट फिल्म्सचा भाग झाली आहे. दिशानीने तिचे पदार्पण २०१७ साली आलेल्या ‘होली स्मोक’ मधून केले होते. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन तिच्या भावाने उशमेय चक्रवर्तीने केले होते. यासोबतच ती अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये अभिनय करताना दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा