‘मी पुन्हा येईन’चा ट्रेलर अपेक्षाभंग करणारा?

0
167
Mi-Punha-Yein
Photo Courtesy : Twitter/PlanetMOTT

सन २०१९मध्ये एका डायलॉगने चांगलेच लक्ष वेधले होते. तो डायलॉग दुसरा-तिसरा कोणता नसून, ‘मी पुन्हा येईन’ हा होता. आता याच नावाने प्रेक्षकांच्या भेटीला वेबसीरिज येऊ घातलीय. या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजचा ट्रेलर अपेक्षाभंग करणारा असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये?
गुरुवारी (दि. २१ जुलै) प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युट्यूब चॅनेलवर ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. राज्यात नवीन सरकार आल्यापासूनच चर्चांना उधाण आले होते. मात्र, सत्तापालट झाल्यानंतर यादरम्यान आरोप-प्रत्यारोप होत असताना अशा विषयावर वेबसीरिज येत आहे. परंतू ट्रेलर पाहून सध्यातरी ही सिरीयस कमी व कॉमेडी जास्त अशी वेबसिरीज वाटतेय. मोठमोठ्या कलाकारांमधील बाष्कळ किंवा पंचसाठी निर्माण केलेले संवाद या ट्रेलरमध्ये दिसत आहे. कुठेतरी सध्या राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीचा फायदा पब्लिसिटी घेण्याच्या नादात ट्रेलरमध्ये तरी सीरिज फसल्यासारखी वाटत असल्याचं बोललं जातंय.

युट्यूबवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
‘मी पुन्हा येईन’ या ट्रेलरला युट्यूबवर एका तासात ५० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओचे जरी व्ह्यूज वाढत असले, तरी काही चाहत्यांना ही वेबसीरिजचा ट्रेलर आवडला नसल्याच्या कमेंट्स आहेत. एका युजरने कमेटं करून लिहिले की, “नुसता बकवास. काहीच कसं ओरिजिनल सुचत नसेल आपल्या लोकांना.”

Mi Punha Yein
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/Planet Marathi

दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, “या वेबसीरिजचं कास्टिंग सीरियसपेक्षा कॉमेडी वाटतंय.” “ही वेबसिरीज शिंदेंचं सरकार पाडेल,” असंही एका युझरने म्हटलं आहे. एक युझरने तर ‘अतिशय खराब’ अशी कमेंट केली आहे. “रानबाजार पण असाच हुलाहूल करून रिलीज केला… स्टोरी मध्ये दम असेल तरच रिलीज करा,” असाही एक चाहता म्हणताना दिसत आहे.

Mi Punha Yein
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/Planet Marathi

या वेबसीरिजबद्दल बोलायचं झालं, तर नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर ही वेबसीरिज घेऊन येणे, खूप घाईचे वाटते. मात्र, ही ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तेव्हाच याला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वेबसीरिजमध्ये मोठ्या कलाकारांचा समावेश
‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, ऋचिता जाधव यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. या वेबसीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारे ५ मराठी सिनेमे तुम्हाला माहितीयेत का? एका क्लिकवर घ्या जाणून

आशा भोसले, सुनील दत्त ते बच्चन कुटुंबीय! भारतीय सिनेसृष्टीने केलेले सगळे वर्ल्डरेकॉर्ड एकाच ठिकाणी

चेष्टा करताय व्हय! एका एपिसोडसाठी ‘एवढे’ लाख कोण घेतं का? वाचा सीआयडी कलाकार किती रुपये छापायचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here