Friday, March 29, 2024

एका वर्षांत 14 सुपरहिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर केला धमाका, वाचा चिरंजीवीचा चित्रपटप्रवास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. 1955मध्ये जन्मलेल्या चिरंजीवीचे नाव अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे चाहते आहेत. या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिले आहे. पण अनेक स्टार्सप्रमाणे त्यांनी राजकारणातही नशीब आजमावले आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही रंजक किस्से……..

अभिनेता चिरंजीवी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1955 रोजी भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील मोगलाथूर या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव अंजना देवी आणि वडिलांचे नाव कोनिडेला व्यंकट राव आहे. चिरंजीवी यांचे खरे नाव कोनिडेला शिव शंकर प्रसाद होते. हे नाव त्यांच्या वडिलांनी ठेवले होते. पण, चिरंजीवीचे कुटुंब सुरुवातीपासूनच हनुमानाचे मोठे भक्त आहे, त्यामुळे त्यांच्या आईने हे नाव बदलून ‘चिरंजीवी’ करण्याचा सल्ला दिला होता. भगवान हनुमानाला अमर अर्थात चिरंजीवी मानले जाते. आपल्या आईच्या सल्ल्यानुसार, अभिनेत्याने आपले नाव कोनिडेला शिवशंकर प्रसादवरून बदलून चिरंजीवी केले.

या चित्रपटातून करिअरची सुरुवात झाली
चिरंजीवी यांनी 1978साली ‘प्रणाम खरीदू’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली, मात्र त्यांना ‘मना पूरी पंडावुलू’ या चित्रपटातून ओळख मिळाली. मात्र, 1978साली प्रदर्शित झालेल्या ‘पुनाधिरल्लू’ या चित्रपटातून चिरंजीवी आपल्या करिअरची सुरुवात करणार होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र काही कारणास्तव हे होऊ शकले नाही. हा अभिनेता तेलुगू चित्रपटसृष्टीचा एक उत्तम कलाकार बनला हेही खरे आहे. त्यानंतर या अभिनेत्याने हळूहळू कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले.

अमिताभ बच्चनही कमाईत मागे राहिले
चिरंजीवीच्या करिअरमध्ये एक काळ असा होता जेव्हा तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता होता. त्यांची गणना भारतातील त्या अभिनेत्यांसोबत होते, ज्यांचे नाव आणि मानधनाची चर्चेत होती. 1992मध्ये आलेल्या ‘घराना मोगुदू’ या चित्रपटातून तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता ठरला. एकदा तर त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणात मागे सोडले होते. असा दावा केला जातो की, एकेकाळी चिरंजीवी एका चित्रपटासाठी दीड कोटी रुपये घेत असत आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांची मानधन एक कोटी रुपये होती.

चिरंजीवी हे नेहमीच गरजूंची मदत करताना दिसतात. रक्तदानाचा विषय असो किंवा चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांसाठी लस वितरणाची व्यवस्था असो, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे गरजूंची मदत केली आहे. आता चिरंजीवी चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी एक मोठं पाऊल उचलणार आहेत. दराबादमधील चैत्रपुरी कॉलनीमध्ये ते आपलं हॉस्पिटल सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढच्या वर्षीच्या वाढदिवसापर्यंत हे रुग्णालय सुरू होईल, असेही त्यांनी सांगितल्याचे म्हटले जाते. हे हॉस्पिटल पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसह सर्व चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. चांगली गोष्ट म्हणजे या रुग्णालयातील बहुतांश रुग्णांची तपासणी आणि उपचार एकतर मोफत केले जातील किंवा त्यांना खूप सूट दिली जाईल.

या पुरस्कारांनी सन्मानित
चिरंजीवीला त्याच्या जबरदस्त कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 9 वेळा दक्षिण भारतीय फिल्मफेअर पुरस्कार आणि चार वेळा नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2011 मध्ये अभिनेत्याला फिल्मफेअरने लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले होते. इतकेच नाही तर या अभिनेत्याला देशातील तिसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार ‘पद्मभूषण’ देखील मिळाला आहे. त्यांना आंध्र विद्यापीठाने मानद डॉक्टरेटही दिली आहे.

राजकारणात नशीब आजमावले
चिरंजीवी यांनी राजकारणातही नशीब आजमावले आहे. 2008 मध्ये, अभिनेत्याने आंध्र प्रदेशमध्ये प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली, त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत चिरंजीवीच्या पक्षाने 18 जागा जिंकल्या.

हेही वाचा-
आता सुट्टी नाही! सलग दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर ‘Gadar 2’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप
ब्रेकिंग! अभिनेता पंकज त्रिपाठीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं

हे देखील वाचा