Monday, September 16, 2024
Home बॉलीवूड लवकरच आई होणाऱ्या स्वरा भास्करने तिचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत केले बेबी बंप फ्लॉन्ट, नेटकरी म्हणाले…

लवकरच आई होणाऱ्या स्वरा भास्करने तिचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत केले बेबी बंप फ्लॉन्ट, नेटकरी म्हणाले…

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सतत तिच्या विवादित वक्तव्यांमुळे गाजत असते. अभिनयापेक्षा जास्त स्वराला तिच्या विधानांमुळेच जास्त ओळखले जाते. यावर्षीच्या सुरुवातीलाच स्वराने लग्न करत तिच्या फॅन्सला आनंदाची बातमी दिली. फेब्रुवारी महिन्यात स्वराने फहाद अहमदसोबत लगीनगाठ बांधत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. तिने जेव्हा तिच्या आणि फहादच्या लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा सगळीकडे एकच गोंधळ झाला.

स्वरा भास्करने लग्नाच्या पाच महिन्यांनी लगेच तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. तिच्या प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर आता एक महिन्याने स्वराने तिचे काही बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर केले आहेत. यासोबतच एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत असून, यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सीचा ग्लो दिसत आहे. नेटकाऱ्यानी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वरा भास्करने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बिना मेकअपची दिसत असून आनंदाने तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे. स्वराने १६ फेब्रुवारी रोजी लग्न केले आणि त्यानंतर दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन दिले होते. तिच्या लग्नाच्या वेळेसच ती प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र अनेकांनी अफवा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. पण लग्नानंतर तीन महिन्यांनीच स्वराने ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले.

दरम्यान स्वरा भास्करने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये फहाद अहमदसोबत लग्न केले. स्वराने सोशल मीडियावर फहादची एक झलक दाखवली होती. मात्र त्यात त्याच्या चेहरा दिसत नव्हता. अखेर यावर्षी तिने त्याचा फोटो शेअर करत लग्न करत असल्याचे जाहीर केले होते. फहाद हा या क्षेत्रातला नसून तो राजकारणात सक्रिय आहे. फहाद हा स्टुडंट लीडर आणि कार्यकर्ता आहे. समाजवादी पार्टीचा सदस्य असणारा फहाद सध्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या समाजवादी पार्टीचा अध्यक्ष आहे.

तत्पूर्वी स्वरा भास्करच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहेत. ‘निल बटे सन्नाटा’, ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘रांझणा’ अशा उत्कृष्ट सिनेमांसाठी तिला ओळखले जाते. तिला शेवटचे २०२० साली आलेल्या ‘जहां चार यार’ सिनेमात पाहण्यात आले होते. लवकरच तिचा ‘मिसेज फलानी’ हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकतो.

अधिक वाचा- 

दुःखद! संपूर्ण जगाला खळखळून हसवणाऱ्या ‘या’ विनोदवीराच्या मुलीचे निधन

“हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कोणीच मित्र नाहीत” बॉलिवूडमधील ‘या’ तुफान लोकप्रिय खलनायकाचा मोठा खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा