Sunday, July 14, 2024

कॅटरिनाने साडी नेसून लावले जोरदार ठुमके, पाहून सलमानने घेतली डुलकी; व्हिडिओवर खिळल्या सर्वांच्या नजरा

कॅटरिना कैफ(Katrina kaif) विक्की कौशलशी लग्न केल्यानंतर सेटल झाली असेल, पण मोठ्या पडद्यावर तिची जोडी सलमान खान(Salman Khan)सोबतच सगळ्यात जास्त जमली आणि लोकांना ती नेहमीच खूप आवडली. दोघांनी सुरुवातीपासून आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि लवकरच कॅटरिना आणि सलमान ‘टायगर 3’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. सध्या सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये कॅटरिना साडी नेसून ठुमके लावताना दिसत आहे, तर सलमान कंटाळून झोपलेला दिसत आहे.

जुना व्हिडिओ पाहा
हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा कॅटरिना कैफ आणि सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट रिलीज होणार होता आणि दोन्ही स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. त्यावेळी दोघेही एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये पोहोचले आणि चित्रपटाच्या गाण्यावर कॅटरिनाने शोच्या जज शिल्पा शेट्टीसोबत जबरदस्त डान्स केला. पण कॅटरिनाला पाहताच सलमान खान आणखीनच मजेशीर होतो आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये तो पुन्हा एकदा मस्तीत मग्न होताना दिसत आहे. डान्सचा कंटाळा आल्यावर तो झोपायचा नाटक करतो आणि हे पाहून सगळे हसायला लागतात. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये सलमानचे असे कृत्य पाहून कॅटरिना अप्रतिम एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

 कॅटरिना आणि सलमान दोघांनीही करिअरच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांना डेट केल्याचे म्हटले जाते. दोघांची नावं एकमेकांशी खूप जोडली गेली होती पण त्यांनी हे नातं कधीच जाहीरपणे स्वीकारलं नाही. त्याचवेळी, कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या प्रेमाविषयी काही काळ चर्चा होती आणि गेल्या वर्षी दोघांचे लग्न झाल्यावर या गोष्टीला पुष्टी मिळाली. त्याचवेळी, लग्नानंतरही कॅटरिना आणि सलमान टायगर 3 मध्ये एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असून त्यात टायगर आणि झोयाची पहिली झलकही दाखवण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘भारतीय आई-वडील तुम्हाला मारून टाकतील…’, प्रसिद्ध अभिनेत्रीवर वीर दासने साधला निशाणा
शंभराहून अधिक कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने केलेला शाहरुखचा घात, सोसावे लागलेले मोठे नुकसान
‘आज रात्री मी एकटी नाहीये…’, म्हणत क्रितीने शेअर केला बेडरूम व्हिडिओ; सर्वत्र रंगलीय चर्चा

हे देखील वाचा