मृण्मयी देशपांडेच्या ग्लॅमरस अदा! फोटो पाहून तर तुम्हीही व्हाल फिदा


साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असल्याचे दिसते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते.

अलीकडेच मृण्मयीने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. हा फोटो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मृण्मयीने पिवळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. सोबतच तिने लाल रंगाची ओढणीही घेतली आहे. एकूणच या लूकमध्ये तिची सुंदरता पाहण्यासारखी आहे.

हे फोटो शेअर करत मृण्मयीने कॅप्शनमध्ये पिवळ्या रंगाचे हार्ट ईमोजी बनवले आहेत. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे. लाईक आणि कमेंट करून नेटकरी यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. शिवाय फोटोवर आतापर्यंत १९ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. (mrunmayee deshpande’s glamorous photo goes viral on internetmrunmayee deshpande’s glamorous photo goes viral on internet)

कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’ या हिंदी चित्रपटाद्वारे मृण्मयीने अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मोकळा श्वास’ मधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अभिनेत्रीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘स्लॅमबुक’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. आता ती ‘सा रे ग म लिटल चॅम्प्स’ हा गायन शोला होस्ट करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

-राज कुंद्राच्या सांगण्यावरून अनेक प्रोडक्शन हाऊस बनवत होते पॉर्न व्हिडिओ; ७० पेक्षाही अधिक लोक लागले पोलिसांच्या हाती

-जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.